66 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन व वर्षावास समापनदिनानिमित्त जम्बोद्विप बहु. संस्थेद्वारा महाभोजनदान

 



66 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन व वर्षावास समापनदिनानिमित्त जम्बोद्विप बहु. संस्थेद्वारा महाभोजनदान 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : जम्बोदविप बहू.संस्थे द्वारा गेले 15 वर्षांपासून सम्राट अशोक चौक, बुद्ध नगर वॉर्ड  येथे महाभोजनदान देण्यात येते. दिनांक 12/10/2022 रोजी बुधवार ला दु. ३:०० वाजता परित्राण-सूत्रपठण व धम्मप्रवचन बौद्ध धम्मगुरु द्वारा झाले. सायं. ७:०० वाजता  भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला मा.ईस्माइल  ढाकवाला यांचे हस्ते माल्यार्पण करून महाभोजनादानाच्या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी घनश्याम मुलचंदानीजी , भास्करभाऊ माकोडे, मुकद्दर सय्यद, महाबोधी बुध्दा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज उमरे,महेश जीवतोडे, मनोज बेले, निलेश खरबडे, इत्यादी मान्यवर तसेच संस्थे चे अध्यक्ष सुयोग खोब्रागडे, कमलेश अलोणे- सचिव, प्रतिक डांगे-कोषाध्यक्ष इत्यादी पदाधिकारी व वॉर्डातील प्रतिष्ठीत व्यक्तींची प्रमुख उपस्थिती होती.  जनतेनी भोजनदानाचा लाभ घेतला. 

अध्यक्ष सुयोग मधुकर खोब्रागडे यांनी भविष्यात संस्थेतर्फे गरजू विद्यार्थांना कोचिंगची व्यवस्था करण्याचा संकल्प सांगितला. या महाभोजनदानाच्या यशस्वितेसाठी  सुमित रामटेके, सोनू खोब्रागडे,  गौतम भगत , संतोष धोटे,आदेश चिकाटे, मंथन पाटील, अमर गायकवाड, साहिल गायकवाड, अक्षय निरंजणे, गोलू कैथवास, आकाश मोटघरे, प्रफुल तामगाडगे, सुनिल ढेंगर, सुधाताई डांगे, सुवर्णाताई पाटील, मनिषाताई ताकसांडे, मनिषा भगत,वंदना मोटघरे,ज्योती तामगाडगे इ.कार्यकर्तांनी अथक परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments