बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई 5 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त ; अंदाजे 10 ते 15 आरोपी अटक



बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई 5 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त  ; अंदाजे 10 ते 15 आरोपी अटक 

◾52 पत्त्यांचा जुगार खेळत होते.

 बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील सातनल चौक पोलिस चौकी क्र.1 च्या समोर श्रीराम वार्डातील  रणदिवे यांच्या घरी बल्लारपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धाड मारली असता त्याठिकाणी लाखोंचा जुगार सुरू होता.

 याप्रकरणीत अंदाजे 10 ते 15 आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे. आज 31 ऑक्टोम्बरला रात्री 8:00 च्या दरम्यान  गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की श्रीराम वार्डात एकाच्या घरी लाखोंचा जुगार भरला असून त्याठिकाणी काही नामवंत 52 पत्त्यांचा जुगार खेळत होते. बल्लारपूर पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात  गुन्हे शोध पथक प्रमुख गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस टीम फिल्मी स्टाईलने रणदिवे यांच्या घरी धाड मारली.

 तिथे जवळपास 5 लाख च्या वरी रुपयांची रोख रक्कम व नामवंत आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे.  वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.



Post a Comment

0 Comments