महिला विक्री रॅकेटचा गंभीर प्रकार पुढे आला; या प्रकरणात महिलेसह 3 व्यक्तींना अटक !

 



महिला विक्री रॅकेटचा गंभीर प्रकार पुढे आला; या प्रकरणात महिलेसह 3 व्यक्तींना अटक !  

 ◾नौकरी मिळविण्याचे आमिष देऊन चक्क महिलेला विकण्यात आले.

◾महिला विक्रीच्या रॅकेट मध्यप्रदेशतील उज्जेन पर्यंत 

बल्लारपूर  ( राज्य रिपोर्टर ) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेस नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन मध्यप्रदेश राज्यात विक्री केल्याप्रकरणी राजुरा येथील एका महिलेसह इतर दोन व्यक्तींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे.   रमाबाई वार्ड राजुरा येथिल रहिवासी आशाबाई कवडू रामटेके उर्फ माधुरी माणिकराव वाघमारे हिने आपल्या जुन्या संबंधातून ओळख झालेल्या पीडित महिलेला नागपूर येथे नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेची मध्यप्रदेशातील उज्जैन येथे विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचे आपल्या पतीसोबत पटत नसल्याने ती बल्लारपूरात एक  महिन्यापूर्वी आपल्या नातेवाईकाकडे राहण्यास आली. 

तिथून काही दिवसांनी ती विसापूर येथिल दुसऱ्या नातेवाईकाकडे म्हणून गेली असताना तिची शेजारी राहणारी आशाबाई वाघमारे हिच्याशी ओळख झाली. तिने पीडितेला नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने बल्लारपूर येथे भेटायला बोलाविले व नागपूर येथे नौकरी लावून देतो असे म्हणून नागपूर नेण्याच्या बहाण्याने थेट उज्जैन येथे घेऊन गेली. 

तिथे प्रेम नावाच्या ओळखीच्या  व्यक्तीने मदन अंबाराम राठी वय ( 40 ) कडून 1 लाख रुपये घेऊन पीडिते सोबत लग्न लावून दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलेल्या पीडितेला संधी साधून राजुरा येथे राहणारी मावशी ला फोन करून घडलेला घटने बाबत माहिती दिली, व उज्जैन येथील केसराबाई मंथन व तिचा मुलगा यांना लग्नासाठी म्हणून आपल्याला 1 लाख रुपये ला विक्री केल्याची माहीती असुन त्यांनी आपल्याला घरात कोंडून ठेवल्याचे सांगितले. यावरून पीडित चा भाऊ आकाश मनोहर पाझारे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.घटनेचे गांभीर्य ओळखत  पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक रमीझ मुलानी आपल्या ताफ्या सोबत मध्य प्रदेशातील उज्जेन ता. महेतपूर येथून आरोपी मदन अंबादास राठी, केसरा बाई मंथन, आशाबाई कवडू रामटेके यांचावर अपराध क्र. 1018/2022,  कलम  366, 368, 370, भादवी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी  देण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ठाकरे करीत आहे.



Post a Comment

0 Comments