24 तास दुर्गापूर पोलिसांचा घरफोडीचा तपास रक्कम 16 हजार व सोने-चांदीचे दागिने जप्त; एक आरोपी अटक

 



24 तास दुर्गापूर पोलिसांचा घरफोडीचा तपास रक्कम 16 हजार व सोने-चांदीचे दागिने जप्त; एक आरोपी अटक

◾रक्कम 16 हजार व सोने-चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 5 हजार 400 रुपयांचा मुद्देमालावर हात साफ

◾पोलिसांनी  चोरी गेलेला संपूर्ण माल जप्त केला.

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 ऑक्टोम्बरला घरफोडीची घटना घडली, यामध्ये 38 वर्षीय फिर्यादी कविता मोतीराम चाफले या आपल्या कुटुंबासहित धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी वर गेल्या होत्या, मध्यरात्री 1 वाजता घरी परत आले असता त्यावेळी घरातील सामान अस्तव्यस्त आढळून आले. घरातील ताला तोडून कुणीतरी अज्ञात घरात शिरले व रोख रक्कम 16 हजार व सोने-चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 5 हजार 400 रुपयांचा मुद्देमालावर हात साफ करण्यात आला. घटनेचे गांभीर्य बघताच पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी पथक नेमत तात्काळ तपास सुरू केला.

24 तासांच्या आत दुर्गापूर पोलिसांनी दुर्गापूर निवासी आरोपी 19 वर्षीय आयुष राजेंद्र चव्हाण याला अटक केली. आरोपी आयुष याने चोरी ची करण्याकरिता 2 अल्पवयीन बालकांचा वापर केला होता.

पोलिसांनी आरोपीला अटक करीत चोरी गेलेला संपूर्ण माल जप्त केला. सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या पोलिसांनी आरोपीला अटक करीत चोरी गेलेला संपूर्ण माल जप्त केला. सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, अशोक मंजुळकर, मंगेश शेंडे, मनोहर जाधव, किशोर वाळके यांनी केली.



Post a Comment

0 Comments