बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून एक व्यक्ती लापता असल्याची माहीती

 




बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून एक व्यक्ती लापता असल्याची माहीती 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय रेल्वे ही दळणवळणासाठी महत्वपूर्ण साधन मानली जाते रेल्वे चा प्रवास सुखकर व सोयीचा मानला जातो त्यामुळं नागरिकांचा रेल्वेने प्रवास करण्याकडे अधिकाधिक कल असतो काल 03 ऑगस्ट ला दक्षिण भारतातील सिकंदराबाद ते बडनेरा रेल्वे स्टेशन दरम्यान कुशल सुरेंद्र खत्री आपल्या पत्नी सोबत प्रवास करीत होते मात्र काल सकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान बल्लारशाह स्थानकावर रेल्वे आली असता सदर व्यक्ती बल्लारशाह रेल्वे स्थानक जि.चंद्रपूर वरुन हरविल्याची माहीती त्यांच्या पत्नीला कळली. तदनंतर त्यांच्या पत्नीने रेल्वे पोलिस बडनेरा येथे पोलिस तक्रार दाखल केली असून सदर लापता व्यक्तीच नाव - कुशल सुरेंद्र खत्री असून वय 32 वर्षे, सदर व्यक्तीने ग्रे रंगाचे टी-शर्ट व काळ्या रंगाचं ट्राऊजर परिधान केले आहे. या व्यक्तीचा चेहरा लांब असून गोरा वर्णाचा आहे. सदर व्यक्तीची उंची 5 फूट 8 इंच आहे सदर व्यक्ती हिंदी, इंग्रजी सिंधी भाषा बोलू शकतो. बारीक हलक्या काळ्या-पांढऱ्या रंगाची दाढी आहे. सदर वर्णनाच्या व्यक्ती हरविली असल्याची तक्रार बडनेरा रेल्वे पोलिस स्टेशनला दाखल केली असून  सदर वर्णनाचा व्यक्ती कुणाला आढळून आल्यास संपर्क साधण्याचं आवाहन एपीआय राजपूत जीआरपी  बडनेरा, एपीआय हर्षल चाफले, जीआरपी बडनेरा, एपीआय दयानंद सरवदे जीआरपी वर्धा पीआय सतीश यादव आरपीएफ वर्धा मो. 7083918714 ई नी केले आहे.







Post a Comment

0 Comments