केंद्र व महाराष्ट्र सरकार च्या चुकीच्या धोरणाविरोधात आरमोरी येथे कॉंग्रेस चे निदर्शने





 केंद्र व महाराष्ट्र सरकार च्या चुकीच्या धोरणाविरोधात आरमोरी येथे कॉंग्रेस चे निदर्शने

 आरमोरी ( राज्य रिपोर्टर ) : केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. पेट्रोल, डीझेल, घरगुती गस चे वाढलेले दर आणी जीवनावश्यक वस्तूवरील वाढलेल्या जीएसटी मुळे सामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा विचार न करता घाईघाईने चालू केलेल्या भारतीय सैन्यदलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. सतत आलेल्या अतिपावसामुळे जमिनी खरडून गेलेल्या असून पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज दिनांक ५ आगस्त २०२२ ला टी पाईट आरमोरी येथे तालुका कॉंग्रेस च्या वतीने निदर्शने देण्यात आले त्यानंतर आरमोरी तहशील कार्यालय येथे तहसिलदार श्री. कल्याणकुमार डहाट यांना निवेदन देण्यात आले.  

यावेळी कॉंग्रेस चे माजी पंचायत समिती सभापती अशोकजी वाकडे, माजी जिल्हा परिषद सद्यक्षा सौ. मनीषाताई दोनाडकर, जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष तेजस मडावी, तालुका कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय सुपारे, महिला कॉंग्रेस चे अध्यक्षा सौ. मंगला कोवे, शहर अध्यक्ष शालीकभाऊ पत्रे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ. निर्मलाताई किरमे, नगरसेविका उषाताई बारसागडे, नगरसेविका सौ. किर्तीताई पत्रे, नगरसेविका सौ. दुर्गाताई लोणारे,  माजी पंचायत समिती सद्यक्षा वृंदाताई गजभिये, सौ. रोशनी बैस,  श्रीकांत वैद्य, सौरभ झ्क्कनवार, वाघाळा ग्राम पंचायत सदस्या सौ. सोनू लिंगायत, सौ. मीराबाई धोटे, अडव्होकेट विजय चाटे, श्री. दिगेश्वर धाईत, श्री. अनिल किरमे, श्री. भीमराव बारसागडे, श्री. संजय लोणारे, प्रविण रहाटे, इशांत वनमाळी, सुरज भोयर. श्री. सत्यवान वाघाडे, छगन शेडमाके, विश्वेश्वर दर्रो, विठ्ठल टेंभूर्ने, कालिदास उसेंडी, नीलकंठ गोहणे, निलेश अंबादे, किशोर प्रधान, सोपान गेडाम तसेच कॉंग्रेस चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments