विरूर पोलिसांची वरूर जवळील जुगार अड्डया वरती धाड

 






विरूर पोलिसांची वरूर जवळील जुगार अड्डया वरती धाड       

◾माल रोख रकमेसह माल ताब्यात घेतला  6 आरोपी अटक 

विरूर ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा तालुकातील विरुर जवळील  वरूर रोड येथील जुगार क्लब एका टिनाच्या शेड मधे पैश्याची बाजी लाऊन हार जितचा खेळ खेळीत असताना ठाणेदार राहूल चव्हाण पोलिस स्टाफ सह पेट्रोलिंग करीत असताना दि. 2/8/2022 ला रात्री 8 : 00 वाजता चे सुमारास  धाड  टाकले व त्यामध्ये 7900/- रुपये चा माल रोख रकमेसह माल ताब्यात घेतला व 6 आरोपी त्यांच्या जाळ्यात सापडले. 

अप.क्र. 199/22 कलम 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887  सहकलम 33 ( क्ष ) 131 महाराष्ट्र अधिनियम 1951 अंतर्गत आरोपीना अटक केली. 

आरोपी 1)  व्यंकटा नरसय्या रज्जम गडम वय ( 45 ) रा. इंधनपल्ली, ता. जलाराम,जि. मंचेरियाल ( तेलंगाणा ), 2) जगदीश गौंड गडमावर वय ( 55 ) रा. रामपुर, जि.मंचेरियाल ( तेलंगाणा ), ३) सत्यनारायण लसमय्या गुऱ्हम वय ( 58 ) रा.ता. जि. असिफाबाद ( तेलंगाणा ), 4) कलकी क्रीष्णा चंद्रशेखर वय (45 ) रा. पेद्दापेल्ली ( तेलंगाणा), 5) रमेश रेबन्ना खनकय्या वय ( 33 ) रा. रेब्बना जि. असिफाबाद ( तेलंगाणा), 6) व्यंकटेश मलय्या तोटा वय ( 36 ) रा. मंचेरियाल ( तेलंगाणा) आणि सदर आरोपी वर गुन्हा दाखल करून सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे, व क्लब चे मॅनेजर वीरू यांच्या कडून प्राप्त महिती  नुसार वरुर जुगार क्लब तेथे तेलंगाणा राज्यातून जुगार खेळण्यासाठी लोक येतात व  3-4 पेक्ष्या जास्त ऐका दिवसात जुगार खेळला जातो व दोन वेळा धाळ पाळल्या नंतरहि हे क्लब कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे स्थानिक गावातील लोकांच्या मनात चर्चेचा विषय बनला आहे.








Post a Comment

0 Comments