सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा 'भव्य आक्रोश मोर्चा'

 




सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा 'भव्य आक्रोश मोर्चा

◾सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव संघर्ष करू-अँड.संदीप ताजने

मुंबई ( राज्य रिपोर्टर )केंद्रातील भाजप सरकारच्या 'सुलतानीसंकटासह बेरोजगारी,महागाईने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टीसोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या वतीने आजमंगळवारी (२ ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेबांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 'भव्य आक्रोश मोर्चाकाढण्यात आला.देशातील तरुणांची फसवणूक करणारी अग्निपथ योजना बंद करासोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी कराझोपडपट्टीधारकांना हक्काचे ५०० चौरस फूट घर द्यावाढती महागाईबेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करादलित-अल्पसंख्यांवरील वाढते अत्याचारावर आळा घालाइंधन दरवाढघरगुती गॅसचे वाढते दर कमी करामुस्लिम बांधवांना उच्च न्यायालयाने दिलेल्या ५% आरक्षणाची अंमलबजावणी करामहार वतनांच्या जमीनी बळकावणाऱ्या धनदांडग्यांपासून वतनाच्या जमीनी मुक्त करून मुळे मालकांना देण्यासंबधी शासन निर्णय करा या आणि अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

 

शहरातील चार पुतळा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे निघालेल्या या 'निळा आंदोलनानेशहरवासियांचे लक्ष वेधले.बसपाचे हत्ती निवडणूक चिन्ह असलेले निळे झेंडे, 'डॉ.बाबासाहेब आंबडेकरक्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयघोषाने अवघी सोलापूर नगरी दुमदुमली होती. यावेळी शहरातल डॉ.बाबासाहेब आंबडेकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. 

केंद्र तसेच राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पंरतुगेल्या सात दशकातील सर्वात वाईट हाल या महागाईच्या संकटात गेल्या आठ वर्षांपासून सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहे,असे मत अँड.ताजने साहेबांनी उपस्थितांना संबोधित करतांना व्यक्त केले. महागाईबेरोजगारीने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांचा आक्रोश सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम बसपा करीत आहे. सामान्य मतदारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिवकण्याची वेळ आली आहेअसे आवाहन यानिमित्ताने अँड.ताजने यांनी केले. सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या बसपाचे हात बळकट करण्याचे आवाहन देखील यानिमित्ताने त्यांनी केले.

सरकारच्या सुलतानी संकटासह अस्मानी संकटाने सर्वसामान्य शेतकरी हवालदील झाला आहे.अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत घोषित करावीअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची वीज बील माफ करावीउसाला एफआरपी प्रमाणे दर द्यावाशेतकऱ्यांच्या मुलांचे शालेय शुल्क माफ करावे तसेच शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मोठे पॅकेज जाहीर करावेअशी मागणी यावेळी प्रदेश प्रभारी मा.हुलगेश भाई चलवादी यांनी केली.


यावेळी प्रदेश महासचिव मा.अप्पा साहेब लोकरेमा.सुदीप गायकवाडप्रदेश सचिव मा. विलास शेरखानेमा.अजित ठोकळे,मा.संजय वाघमारेप्रदेश सदस्य मा.बलभीम कांबळेसोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.भालचंद्र कांबळेशहर अध्यक्ष मा.देवा भाई उघडे,उपाध्यक्ष अशोक ताकतोडेमहासचिव रवी सर्वगोडकार्यालय सचिव करण काळेउपाध्यक्ष राहुल सर्वगोडसचिव प्रवीण कांबळेशहर सचिव मिणाज शेखरमेश गायकवाड,मोहमद जकार्ते मोहम्मद शफी इंद्रेकर व जिल्ह्यातील सर्व  पदाधिकारीकार्यकर्ते उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments