गणेश उत्सव साजरा करत असताना गणेश मंडळांना सहकार्य करा - आ. किशोर जोरगेवार

 





गणेश उत्सव साजरा करत असताना गणेश मंडळांना सहकार्य करा - आ. किशोर जोरगेवार

◾पोलिस विभागाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन

 चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुरात पारंपारिकरित्या गणेश उत्सव साजरा गेल्या जातो या उत्सवाला प्राचीन परंपरा दोन वर्षानंतर गणेश भक्तांना आता गणेश उत्सव साजरा करता येणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्वीगुणित झाला आहे. मात्र प्रशासनाचीही आता जबाबदारी वाढली आहे. गणेश मंडळांना देण्यात येणारी परवाणगी, पेंडालातील लाईट जोडणी यासह इतर अनेक बाबींसाठी गणेश मंडळांना अडचणी येत असतात त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी एक खिडकी उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करत असतांना गणेश मंडळांना सहकार्य करा अशा सूचना आ. किशोर जोरगेवार यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना प्रशासनाला केल्या आहेत.

        मोहरम, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी  व गणेशोत्सव या अनुषंगाने आज शुक्रवारी पोलिस विभागाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा अप्पर आयुक्त विपिन पालिवाल, जेल अधीक्षक हागे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

       यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, गणेश पेंडालात लाईट जोडणी करिता जाचक अटी आहेत. त्या शिथिल करत गणेश मंडळांकडून विद्युत जोडणीसाठी घेतलेली अनामत रक्कम मंडळांनी बिल अदा करताच त्यांना परत करण्यात येईल असे नियोजन प्रशासनाने करावे, गणेश मंडळांना वीज जोडणी, परवानगी, यासारख्या बाबींसाठी कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागतात त्यामुळे गणेश मंडळांची हि अडचण दूर करण्यासाठी एक खिडकी उपक्रम राबविण्यात यावा येथे पोलीस विभाग, धर्मदाय विभाग, महापालिका विभाग आणि महावितरण विभागासंदर्भातील कामे तत्काळ करून देण्यात यावी अशा सूचनाही यावेळी बोलताना  आ. जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.

       येणारा काळ सण उत्सवांचा आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासुन सार्वजनिक उत्सव बंद होते. मात्र यंदा हे उत्सव साजरे करता येणार आहे. त्यामुळे सहाजिकच आपला उत्साह द्विगुणीत झाला आहे. मात्र हे उत्सव साजरे करत असतांना चंद्रपूर जिल्हाची शांतप्रिय ही ओळख कायम असली पाहिजे. आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यात देशात जगत असतांना जेवढे आपले अधिकार तेवढ्याच आपल्या जबाबदा-याही आहेत. याची आपण जाण ठेवली पाहिजे असे यावेळी ते म्हणाले   दरवर्षी शांतता समितीची बैठक होत असते. सण उत्सावादरम्याण योग्य उपाययोजना करण्यासाठी ही बैठक आयोजित केली जात असते. मात्र यंदा आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत त्यामुळे या बैठकीचे विशेष महत्व आहे. यंदा देश प्रत्येक घरी तिरंगा हा अभियान राबवित आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याही मोठ्या उत्साहाने सहभागी झाला आहे. या अभियाना अंतर्गत प्रत्येक घरी तिरंगा दिसेल यात शंका नाही. मात्र तिरंगा फडकवत असतांना योग्य ती काळजीही आपल्याला घ्यायची आहे. राष्ट्रध्वज पाहताच एक वेगळी शक्ती निर्माण होत असते. त्यामुळे आपण चंद्रपूरात १०० फुट तर घुघुस येथे ७५ फुट लांबीचा कायमस्वरूपी राष्ट्रध्वज उभारत आहोत. यासाठी आपण २५ लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध करुन दिला आहे. पोलिस मैदान येथे हा राष्ट्रध्वज उभारल्या जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले..

        हा महिना मोहरम, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी व गणेशोत्सव या सार्वजनिक उत्सवांचा आहे. त्यामुळे हे उत्सव धार्मिक वातावरणात साजरे करत असतांना आपल्याला येणा-या अडचणी जाणून घेण्यासाठी शांतता समितीच्या बैठीचे हे आयोजन आहे. यात आपण केलेल्या सुचनांची दखल घेत त्या सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न केल्या जातील असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी यंदा रामाळा तलाव येथे गणेश विसर्जन होणार नसल्याने गणेश मुर्ती विर्सजनासाठी इराई नदी येथे घाट तयार करण्यात यावे, विसर्जन स्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी, रस्त्साची डागडुजी करावे, निर्माल्यासाठी मनपाने घंटागाडीची व्यवस्था करावी गणेश मंडळांनी महावितरनचे बिल अदा केल्यावर तत्काळ डिपोजिट रक्कम परत करण्यात यावी आदि सुचना यावेळी गणेश मंडळांनी केल्यात. सदर बैठकीला शहरातील गणेश मंडळ पदाधिका-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






Post a Comment

0 Comments