बल्लारपुरातील नगर परिषद द्वारे संचालित आठवडी बाजारात पाणी क्लीनिंग रूम मधील गॅस लिकेजमुळे धावपळ

 







बल्लारपुरातील नगर परिषद द्वारे संचालित आठवडी बाजारात पाणी क्लीनिंग रूम  मधील गॅस लिकेजमुळे धावपळ 

◾मोठा अपघात टळला 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर नगर परिषद द्वारे संचालित आठवडी बाजारात असलेल्या जल शुद्धीकरण कक्षातील गॅसच्या लिकेजमुळे त्यातून धुवा निघताना दिसून आल्यामुळे तसेच  रविवार आठवडी बाजार असल्यामुळं अफरातफरी झाल्याचं दिसून आलं यामुळं बचत भवन परिसरातील चहावाले, फळविक्रेते, भाजी विक्रेत्यांमध्ये पळापळ दिसून आली मात्र नागरिकांच्या समयसूचकतेने व वेळीच घटनास्थळी दाखल झालेल्या नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार  सायंकाळी 4:00 वाजताच्या दरम्यान आठवडी बाजारातील जल शुद्धीकरण सयंत्र मधून आगीचे धूर निघतांना दिसून येताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले सयंत्रमध्ये जाऊन विजेचे कनेक्शन बंद केले विशेष म्हणजे यावेळी तिन गॅस सिलेंडर मधील एक सिलेंडर लिकेज असल्याचं दिसून आलं त्यामुळं गॅस लिकेज होत होती. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला.






Post a Comment

0 Comments