बल्लारपूर येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी 70 वर्षीय वृद्धास अटक

 





बल्लारपूर येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरातील  दानपेटी चोरी प्रकरणी 70 वर्षीय वृद्धास अटक

◾2 दुकान फोडून माल लंपास करणाऱ्या 3 विधीसंघर्ष बालकास अटक, 1 फरार  

◾बल्लारपूर शहरातील व्यकटेश एम्पायर मधील ज्वेलरी शॉप व आठवडी बाजारातील किराणा दुकानाच्या चोरी प्रकरण 


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात मागील पंधरवाड्यात चोरांनी धुमाकूळ माजविला होता या अंतर्गत बल्लारपूर शहरातील कारवा रोड वरील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात दानपेटी फोडण्याचे घटना घडली होती या घटनेची तक्रार बल्लारपूर पोलिसात दाखल केली असता याचा तपास करून पोलिसांनी या प्रकरणी  70 वर्षीय वृध्द असलेले बंडू मारोती रुद्रपवार हें राजुरा तालुक्यातील रहिवासी असून  यांना अटक केली आहे. 

तर दुसऱ्या एका प्रकरणात व्यकटेश एम्पायर मधील ज्वेलरी शॉप व आठवडी बाजारातील किराणा दुकानाच्या चोरी प्रकरणात 4  विधीसंघर्ष बालक असून यापैकी 3 बालकांना ताब्यात घेण्यात आले असून 1 बालक फरार असल्याचे वृत्त आहे. 

विशेष म्हणजे दुचाकी चोरांकडून एक स्प्लेंडर व एक ऍक्टीवा जप्त कऱण्यात आल्या आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या बालकांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मा. उमेश पाटील, पोलिस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड, गुन्हे शाखा व त्यांची चमू करीत आहेत.








Post a Comment

0 Comments