राजुरा तालुक्यातील देवाड्यातील गॅस्ट्रेाची 7 व 4 रुग्णांच्या मृत्यूला जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार, वरीष्ठांना जाब विचारणार - हंसराज अहीर





राजुरा तालुक्यातील देवाड्यातील गॅस्ट्रेाची 7 व 4 रुग्णांच्या मृत्यूला जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार, वरीष्ठांना जाब विचारणार - हंसराज अहीर

◾प्रशासनाने शुध्द पेयजल उपलब्ध करुन तातडीने उपाययोजना कराव्यात

◾प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 97 रुग्णांची नोंद

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा तालुक्यातील देवाडा व अन्य गावातील गॅस्ट्रेाच्या उद्रेकाला जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार असून परिस्थितीची संपूर्ण जाणीव असतांना हलगर्जीपणामुळे देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 रुग्णांचा मृत्यु होणे ही बाब आरोग्य खात्याचे धिंडवडे काढणारे असल्याची संतप्त प्रतिक्रीया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर  यांनी देवाडा येथे दि. 05 ऑगस्ट  रोजी भेट दिल्यानंतर व्यक्त केली.

ग्रामपंचायत सचिव महिण्याभरापासून कर्तव्यावर नाही. नळ योजनेच्या दुषित पाण्यामुळे देवाडा येथे रुग्णांची प्रकृती ढासळत असल्याचे ठावूक असतांना ग्रामसेवकाने आपल्या कर्ताव्यात कसूर केल्याने या गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गावात आर.ओ. प्लान्टला अपूरा पाणी पुरवठा होतो. दोन आर.ओ. प्लान्ट असतांना एक नादुरुस्त आहे. परंतु दुरुस्तीबाबत दुर्लक्ष झाल्याने दुषित पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले. जर लोकांना वेळीच शुध्द पाणी पुरविल्या गेले असते तर या गावात 4 रुग्णांवर मृत्यु ची पाळी उद्भवली नसती. रुग्णालयात 3 रुग्ण दगावले व 1 रुग्ण घरी दगावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णाची नोंद नसली तरी अजूनही गावातली परिस्थिती भयावह असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.  

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 97 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यात देवाडा सह, सोंडो, टेंभुरवाही व अन्य गावातील रुग्णांचा समावेश असतांना आरोग्य यंत्रणा झोपा घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत अहीर यांनी देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करुन येथील आरोग्य कर्मचाऱ्यांवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे  नियंत्रण नसल्याची बाब अधोरेखीत केली आहे. ऍम्बुलन्स  चालकाच्या मुजोरी व अरेरावी बाबत लोकांच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी डाॅक्टर्स, कर्मचारी उपस्थित नसतात. जे एमबीबीएस डाॅक्टर आहेत ते येतच नाही असे नागरीकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या  भरवशावर हे केंद्र चालत असल्याने गॅस्ट्रेाचे गांभीर्य वाढले असल्याचा आरोप हंसराज अहीर यांनी केला असून या एकंदर प्रकाराला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे  अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

गॅस्ट्रेाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनास शुध्द पेयजलाची तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना करतांनाच या संपूर्ण प्रकरणाचा वरीष्ठांना जाब विचारु असेही हंसराज अहीर यांनी ग्रामस्थांशी बोलतांना सांगीतले. त्यांनी गॅस्ट्रेानी दगावलेल्या रुग्णांप्रती आस्था दाखवत घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन केले. हंसराज अहीर यांच्या समवेत चंद्रपूरचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, राजु घरोटे, अरुण म्हस्की, सतिष  धोटे, सुनिल उरकुडे,  प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, राजू डोहे, तिरुपती नलल्ला, राहुल सुर्यवंशी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments