बल्लारपूर शहरातील महिलांना शेती कामासाठी घेवून जाणारे वाहन येनबोडी जवळ पलटले, 5 गंभीर तर 3 किरकोळ जखमी

  





बल्लारपूर शहरातील महिलांना शेती कामासाठी घेवून जाणारे वाहन येनबोडी जवळ पलटले, 5 गंभीर तर 3 किरकोळ जखमी 

◾बल्लारपुरातील साईबाबा वॉर्डातील निवासी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील साईबाबा वॉर्डातील निवासी असलेल्या महिलांना शेतीच्या कामासाठी किन्ही येथे घेवून जाणारे चारचाकी वाहन टाटा सुमो क्रं. MH 32 EQ 0369 ने शेतातील निंदनाकरिता जात असतांना आज सकाळी 9:00 वाजताच्या दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व सदर वाहन विलास तेलंतुंबळे यांच्या शेतात जाऊन पलटी झाले. 

या अपघातात 5 गंभीर जखमी तर 3 किरकोळ जखमी असल्याचे वृत्त आहे सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात पूनम कमलाकर बोभाटे वय - 40, ललिता बबन चौधरी वय - 40, कांचन संघदीप कुंभारे वय - 39, निशा शिवकुमार कैथवास वय - 50, सुरेश बहुरिया ( वाहनचालक ) वय - 39, सदर 5 व्यक्ती गंभीर जखमी तर नीलिमा विनोद वाढई वय - 35, वर्षा संतोष नन्नावरे वय - 34, अर्चना नरेश हनुवते वय -30 किरकोळ जखमी आहेत सदर अपघाताची माहीती कळताच परिसरातील व्यक्तींनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून जखमींना गाडी बाहेर काढले व सदर अपघाताची माहीती बल्लारपूर पोलिसांना दिली व अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे प्राथमिक उपचार साठी दाखल कऱण्यात आले होते. 

मात्र या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या 4 महिला व वाहनचालकांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे दाखल कऱण्यात आले. असून यापैकी काही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.







Post a Comment

0 Comments