भारतीय जैन संघटना द्वारा चंद्रपुर जिल्ह्यातील कोविडमुळे अनाथ झालेल्या 11 बालकांचे शैक्षणिक पुनवर्सन करीता पहिली बैच पुणे येथे त्यांच्या पालक सोबत पाठविण्यास आले

 







भारतीय जैन संघटना द्वारा चंद्रपुर जिल्ह्यातील कोविडमुळे अनाथ झालेल्या 11 बालकांचे शैक्षणिक पुनवर्सन करीता पहिली बैच पुणे येथे त्यांच्या पालक सोबत पाठविण्यास आले 

◾पुन्हा दूसरी बैच लवकर पाठविण्यास येणार


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय जैन संघटना 1993 पासून भूकंपग्रस्त, अनाथ,  निराधार, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील बालके तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या महाराष्ट्रातील 700 विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांचे इयत्ता. 5 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्वांचे शैक्षणिक पुनवर्सन केले जाणार आहे.

चंद्रपुर जिल्ह्यातील कोविड -19 महामारीमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांचे शैक्षणिक पुनवर्सन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये वाघोली, पुणे शैक्षणिक पुनवर्सन प्रकल्पात आज चंद्रपुर जिल्ह्यातील 11 विविध तालुक्यातील बालकांची पहिली बैच त्यांच्या पालका व नातेवाईकांना सोबत चंद्रपुर येथून समोरील शैक्षणिक प्रवेश करिता त्यांना चंद्रपुर वरुन पुणे करीता ट्रैन द्वारे भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन वाघोली पुणे येथे पाठविण्यास आले आहे. हे विद्यार्थी कोविडमुळे अनाथ झालेत. शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये बालक इयत्ता 5 वी, 6 वी व 7 वी मध्ये प्रवेशास पात्र आहेत. एका कुटुंबातील एकाच किंवा दोन विद्यार्थ्यांस प्रवेश दिला. शैक्षणिक पुनवर्सन प्रकल्पाच्या वसतीगृह पाठविण्यास पालकांची संमती गरजेची होती ती घेण्यात अली. बालकांची बीजेएसच्या (BJS) शैक्षणिक पुनवर्सन प्रकल्पात शिक्षण घेण्याची इच्छा असावी. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर व आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन निवड करण्यात अली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  इ 5 वी ते इ 12 वी पर्यंतचे शैक्षणिक पुनवर्सन केले जाईल. पुन्हा दूसरी बैच चंद्रपुर जिल्ह्यातील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय जैन संघटना, शैक्षणिक पुनवर्सन प्रकल्प, वाघोली, पुणे येथील  वसतीगृह पाठविण्यास येईल.

कोविडमुळे अनाथ झालेल्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा इयत्ता १२ वीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संघटनेकडून केला जाणार आहे. त्यासाठी चंद्रपुर जिल्हातून व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यतून माहिती मागवण्यात येत आहे. पाचवी ते सातवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटनेच्या वाघोली (पुणे) येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहात व्यवस्था केली जाणार आहे. एका कुटुंबातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना पुनर्वसन वसतिगृहात पाठविण्यासाठी त्यांच्या कायदेशीर पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली आहे.

यावेळी भारतीय जैन संघटना चे ब्रांड एंबेसडर व प्रकल्प संयोजक दीपक पारख,  राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अमर गांधी,  संदीप बांठिया, दीपक डगली, पूर्व विभागीय अध्यक्ष व संयोजक प्रशांत बैद, राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, जिल्हाध्यक्ष गौतम कोठारी, पूर्व जिल्हा महासचिव जितेंद्र जोगड,  जिल्हा महासचिव अनिल बोथरा, चंद्रपुर शहर अध्यक्ष राजा पारख, अमित खजांची, हेमंत सिंघवी, सिद्धार्थ कोठारी, सुनील पांचोली, डॉ.आनंद बैद, चेतन झांमड, स्वदेश गांधी, महावीर बोथरा, मोनु डगली, रोहन शाह, ऋषभ पुगलिया, अनमोल खटोड़, प्रकाश, कविता मैडम, मुथा व जैन समाज चे नागरिक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments