बल्लारपुर तालुक्यातील मौजा दुधोली, बामणी, येथे अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.



बल्लारपुर तालुक्यातील मौजा दुधोली, बामणी, येथे  अतिवृष्टीमुळे  शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.

 ◾मा. श्री. अजय गुल्हाणे  जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकारी यांची सभा घेऊन पुरामुळे झालेल्या शेत पिकाच्या व घराच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना


 बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : दिनांक. 21/7/2022 रोजी सायंकाळी 5:00 वाजता मा. श्री. अजय गुल्हाणे साहेब जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी बल्लारपुर तालुक्यातील मौजा दुधोली, बामणी, येथे   मागील 15 दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे  शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीता भेट दिली. या वेळी सोबत  मा.उपविभागीय अधिकारी बल्लारपूर सौ. दीप्ती सुर्यवंशी - पाटील, मा.तहसिलदार बल्लारपूर श्री. संजय राईंचवार, . मुख्याधिकारी न.प बल्लारपूर श्री. विजय देवळीकर, तालुका कृषी अधिकारी श्री. श्रीधर चव्हाण, श्री. सुभाष ताजणे सरपंच बामणी, बामणी, दूधोली येथील शेतकरी, श्री. शंकर खोब्रागडे मंडळ अधिकारी, श्री. शंकर खरूले तलाठी, श्री. राहुल अहिरराव कृषी सेवक, श्री. वतन दुबे अभियंता सेंट्रल वॉटर कमिशन, श्री. वाढई अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री. वैभव जोशी शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची  उपस्थिती होती. यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी वर्धा नदी च्या पुलाची पाहणी केली. तसेच नगर परिषद क्षेत्रातील गणपती वॉर्ड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नंतर मा. जिल्हाधिकारी यांनी  तालुक्याच्या सर्व प्रमुख अधिकारी यांची उपविभागीय कार्यालयात सभा घेऊन पुरामुळे झालेल्या शेत पिकाच्या व घराच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments