बल्लारपूर पेपर मिलचा प्रताप ; शासनाच्या परवानगीशिवाय सुरू केले गॅस प्लांटचे काम

 



बल्लारपूर पेपर मिलचा प्रताप ; शासनाच्या परवानगीशिवाय सुरू केले गॅस प्लांटचे काम

गॅस प्लांटचे काम थांबवून बल्लारपूर पेपर मिलच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली.


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर नगर परिषदेच्या हद्दीतील बल्लारपूर पेपर मिल ( BGPPL ) द्वारा नवीन गॅस प्लांटचे काम शासनाची कोणतीही परवानगी न घेता सुरू केलेली आहे. प्रदूषणाच्या विळख्यात असलेल्या बल्लारपूरला पुन्हा प्रदूषणाच्या जाळ्यात अडकवण्याचे काम बल्लारपूर पेपर मिल करत आहे. बल्लारपूरच्या जनतेचा विचार करून सुरू असलेला गॅस प्लांट बंद करावा व शासनाची कोणतीही परवानगी न घेतलेल्या बल्लारपूर पेपर मिलच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली.

  यापूर्वीच अनेक घातक प्लांट पेपर मिलने सुरू केलेले असून प्रदूषणात संपूर्ण बल्लारपूर शहर महाराष्ट्रात एक नंबर वर आलेला असल्याने बल्लारपूर येथील जनतेस कोणत्या ना कोणत्या भयंकर बिमारीचा सामना करावा लागत आहे.नवीन गॅस प्लांट लागल्यानंतर बल्लारपुरात प्रदूषणात कमालीची वाढ होऊन जनतेला येथे राहणे असह्य होणार आहे. जनतेला भोपाल सारख्या भयंकर कांडाचा सामना होऊ शकतो तरी बल्लारपूरात यानंतर कोणताही नवीन गॅस प्लांटची निर्मिती देऊ नये अशी जनतेची तीव्र मागणी आहे. तरी सुरू असलेले काम तात्काळ बंद करून थांबवण्यात यावे व बल्लारपूर पेपर मिलच्या अधिकाऱ्यांवर शासनाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता गॅस प्लांट सुरू केले त्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केली. जर तात्काळ गॅस प्लांटचे काम बंद झाले नाही व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी द्वारा  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे,संपत कोरडे, अनिरूप पाटील, जाकीर खान, स्नेहल साखरे, भूषण पेटकर तथा वंचित अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments