व्यावसाय शिक्षणासाठी शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी

 



व्यावसाय शिक्षणासाठी शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी 

वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : विद्यार्थांमध्ये व्यवसाय दृष्टीकोन रुजवावा या उद्देशाने राज्यात जिल्हा परिषद , नगर पालिका , आश्रम शाळेमध्ये व्यावसाय अभ्यासक्रम २०१५ पासून समग्र शिक्षा अंतर्गत केंद्र पुरस्कुत योजना राबवली जात आहे. जिल्ह्यातील ९ शाळांमध्ये व्यावसाय शिक्षण सुरु असून प्रत्येक शाळेत दोन व्यावसायिक विषय जसे की मल्टी स्कील, आँटोमोबाईल, रिटेल, आयटी, हेल्थकेअर, इलेक्ट्रोनिक्स, इ. शिकविल्या जात आहे. यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत स्कील डेव्हलपमेंट कापोर्रेशनची मान्याता असलेल्या संस्थामार्फत कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. परंतु शाळा सुरु होऊन महिना झाला तरी शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेत व्यावसाय अभ्यासक्रमाचे वर्ग होत नाही आहे. 

वर्ग १०वी  व वर्ग १२वी बोर्डाचा मुख्य विषय असल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.पालक आणि शिक्षक दोघेही चिंताग्रस्त आहेत. व्यावसायिक शिक्षकांनां त्वरित नियुक्ती मिळावी व समान पद समान वेतन मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक शिक्षकांनी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी वर्धा जिल्ह्यातील व्यावसाय शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments