जुनोना तलावाच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यातून मित्राला वाचविण्यासाठी गेलेल्या मित्राचा मृत्यू

 





जुनोना तलावाच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यातून मित्राला वाचविण्यासाठी गेलेल्या मित्राचा मृत्यू 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील 15 दिवसापासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणचे नदी-नाले ओसंडून वाहू लागले त्यामूळे रस्त्यावरून वाहणारा पाण्यामुळे अनेक अपघात घडून काही नागरिकांचे जिव ही गेले आहे.

 अशाच प्रकारची एक घटना जुनोना तलावाच्या वेस्टवेअर मधून जाणाऱ्या पाण्यामुळं घडली बल्लारपूर शहरातील नंदलाल  कैथवास वय ( 45 ) हा आपल्या मित्रांसोबत जुनोना तलावावर गेला असता त्यांच्या दोन मित्रांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. व एका मित्राला वाचविण्याच्या नादात दुसऱ्या मित्राचा हकनाक जिव गेला. या संदर्भात पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार तिघे जण जुनोना तलावाच्या वेस्टवेअर पाण्यात पोहत असतांना एक मित्र पाण्यामधून वाहून गेला व लगतच्या झुडुपात जाऊन अडकला व बराच वेळ तो त्या ठिकाणी अडकून पडला होता. 

त्याला ईतर दोन मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला यापैकी नंदलाल कैथवास हा सुध्दा पाण्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व प्रवाहाचा वेग असल्यामुळं नंदलाल चा मृत्यू झाल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला मात्र सुरुवातीला वाहून गेलेल्या व झाडी मध्ये अडकून पडलेल्या व्यक्तीला वाचविण्यात यश आले मात्र मित्राचा मृत्यू झाला या घटनेची माहीती बल्लारपूर पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शोध कार्य सुरू होते उशिरा मृतदेह मिळाल्यानंतर उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





Post a Comment

0 Comments