पोलिस स्टेशन बल्लारपुरात पार पडला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ

 






पोलिस स्टेशन बल्लारपुरात पार पडला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ 

◾मुख्याधिकारी व तहसीलदार बल्लारपूर यांच्या सेवानिवृत्ती पर बल्लारपुरातील सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार !

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : वर्तमान काळात नौकरी मिळणे फार जिकरीचे काम त्यातही मिळालेली नौकरी टिकविणे सुध्दा महत्वाचे विशेष म्हणजे प्रशासकीय स्तरावर काम करताना अधिकाऱ्याला वारंवार नवनवीन ठिकाणी सेवा द्यावी लागते. त्यामुळं चांद्यापासून बांद्या पर्यंत नौकरी करताना मात्र आम्हाला बल्लारपूर शहरात सर्व समाज घटकांनी सर्वतोपरी सहकार्य केले मग ती पूर परिस्थिती असो वा कोरोनाच्या दोन्ही लाटामध्ये लाभलेलं सहकार्य असो असे उदगार आपल्या सेवानिवृत्ती पर सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मा.संजय राईचंवार, तहसीलदार बल्लारपूर व मा. विजय देवळीकर मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांनी व्यक्त केले.

        बल्लारपूर शहरातील प्रशासकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले मा. संजय राईंचवार, तहसीलदार बल्लारपूर व मा. विजय देवळीकर मुख्याधिकारी बल्लारपूर यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बल्लारपूर पोलिस निरीक्षक मा. उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात आलं होत या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ काँग्रेस नेत्या डॉ. रजनी हजारे, व प्रमुख अतिथी म्हणुन मा. चंदनसिह चंदेल, माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, डॉ. विजय कळसकर, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, मा. किरणकुमार धनावडे, गट विकास अधिकारी, बल्लारपूर, वैभव जोशी, शाखा अभियंता सा.बा.वि.बल्लारपूर, उमेश पाटील, पोलिस निरीक्षक, बल्लारपूर, घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य यांच्यासह सपोनि विकास गायकवाड, सपोनि रासकर साहेब, सपोनि शैलेंद्र ठाकरे, सपोनि तिवारी ई ची विचार पिठावर उपस्थिती होती. यावेळी विविध सामाजिक संघटना, वैद्यकीय अधिक्षक, पत्रकार संघ, विविध राजकीय पक्ष तसेच पोलिस विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार कऱण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी सत्कारमूर्तीच्या स्वागतानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केल या कार्यक्रमाचं संचालन श्रीनिवास सुंचूवार तर आभार प्रदर्शन ठाकरे साहेब यांनी केले.






Post a Comment

0 Comments