बल्लारपुरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, पती व मुलगी गंभीर जखमी

 







बल्लारपुरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, पती व मुलगी गंभीर जखमी 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील मौलाना आजाद वॉर्डातील रहिवासी असलेल्या आयु. विनिता योगेश पुणेकर वय ( 36 ) वर्षे आपल्या कुटुंबासह घरी झोपी गेल्या असता काल 31 जूलैची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली काल रात्री 11:45 वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराची भिंत कोसळून विनिताचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला तर त्यांचे पती योगेश पुणेकर, वय ( 39 ) व मुलगी सोनू वय ( 11 ) वर्षे या गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्या ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उपचार सुरू आहेत या घटनेचे वृत्त बल्लारपूर पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.






Post a Comment

0 Comments