काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं बल्लारपुरात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

 






काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं बल्लारपुरात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हें विदर्भातील पूर परिस्थितीचा दौरा करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना राजुरा येथील पूरस्थिती व त्यामूळ झालेल्या नुकसानीची पाहणी करून चंद्रपूरला परत जात असतांना बल्लारपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ( नगर परिषद ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले व जोरदार घोषणाबाजी केली. तत्पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रपुर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, प्रकाश देवतळे, जिल्हाध्यक्ष चंद्रपुर माजी आमदार अविनाश वाजूरकर ई नी बल्लारपूर शहरातील राष्ट्रीय स्मारक असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

       बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौकात शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, डॉ. रजनी हजारे,  छाया मडावी, सुनंदा आत्राम,  दिलीप माकोडे, डॉ. मधुकर बावणे, नगरसेवक भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य, डॉ. सुनिल कुल्दीवार, व्यकटेश बाल बैरय्या, निशांत आत्राम, सतीश करमरकर, आनंद बिरय्या, नरसिह रब्बावर, रोजिदा ताजुद्दीन, शोभा महतो, डेव्हिड कामपेल्ली, अफसाना सययद, राजू बहुरिया, करण कामटे ई ची यावेळी उपस्थिती होती.








Post a Comment

0 Comments