कार ने दिली दुचाकीला धडक
◾कोणतीही इजा नाही, मात्र दुभाजकावरील विजेचे खांब कोसळले
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये एक भरधाव वेगाने येणारी कार एका दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. या अपघातात अगदी थोडक्यात बचावलेला दुचाकीवरील युवक काही घडलेच नाही असे भासवत भरधाव वेगात पुढे निघूनही गेला. तर ती भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून पलटी झाली. सुदैवाने या अपघातात गाडीतील कोणालाही इजा झाली नाही. हि संपूर्ण घटना त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हि अपघातग्रस्त कार यवतमाळमधील एका व्यापाऱ्याची आहे. हा व्यापारी आपल्या कारमधून कुटुंबासोबत सिरोंचाच्या दिशेने चालला होता. या कारमध्ये एकूण चार लोक होते. हि कार बल्लारपूर शहरातील मुख्य रस्त्यावर महाराजा हॉटेल परिसरात आल्यानंतर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर जाऊन धडकली. सुदैव म्हणजे एवढा भयानक अपघात घडूनही दुचाकीस्वार किंवा कारमधील कुणालाही साधे खरचटले देखील नाही. दुचाकीस्वारही दुचाकी उटलून पुन्हा भरधाव वेगात निघून गेला. तर कार दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून कार पलटी झाली. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
0 Comments