केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली शुभेच्छापर कवितेची भेट.
नागपुर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमीत्त विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरात श्री. नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. मुनगंटीवार यांनी शुभेच्छापर कवितेची भेट ना. गडकरी यांना दिली.
ना. नितीन गडकरी यांचा विकासाचा व जनकल्याणाचा ध्यास आपल्यासाठी कसा प्रेरणादायी आहे असा भाव या कवितेतुन व्यक्त करण्यात आला आहे. रस्ते विकास साधत देशाचे चित्र त्यांनी कसे पालटले अशी भावना व्यक्त करत रंजल्या गांजल्यांची सेवा करणा-या गडकरींमध्ये आम्ही तुकोबांच्या वचनातील साधु कसा बघतो असा आगळा भाव या कवितेतुन व्यक्त करण्यात आला आहे. लोककल्याण व विकासासाठी गडकरींना दीर्घायुष्य लाभो व त्यांची आभाळमाया आपल्यावर कायम राहावी, अशी अपेक्षा या शुभेच्छापर कवितेत आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
0 Comments