आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांची भेट

 









आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांची भेट

◾विकास प्रक्रिया व सांस्कृतिक देवाणघेवाण याबाबत झाली विस्तृत चर्चा


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांच्याशी  मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाच्या विवीध प्रकल्पाबाबत कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांच्याशी चर्चा केली.चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाशी संबंधित विविध प्रकल्प प्रामुख्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प , देशातील अत्याधुनिक सैनिक शाळा , वन अकादमी , बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र , बोटॅनिकल गार्डन , कॅन्सर हॉस्पिटल तसेच आदिवासी युवकांना , विद्यार्थ्यांना क्रीडा व शैक्षणिक सुविधा पुरविणे या बाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली. 

भारत आणि सिंगापूर या देशांतील विविध विषयांवर देखील यावेळी चर्चा केली. विशेषतः 9 दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये सिंगापूर ज्या ठिकाणी भारताचा सांस्कृतिक प्रभाव कायम राहिला आहे , तो प्रभाव अधिक वृद्धिंगत करत दोन्ही देशांचे नाते अधिक दृढ कसे होईल यावर उभयतांमध्ये विस्तृत चर्चा झाली. विकास प्रक्रिया व सांस्कृतिक देवाणघेवाण यात सिंगापूर सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन सिंगापूर चे कोंसुलेट जनरल चेंग मिंग फुंग यांनी दिले.



Post a Comment

0 Comments