बल्लारपूरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्साहात साजरी, रात्री उशिरापर्यंत अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन !

 








बल्लारपूरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्साहात साजरी, रात्री उशिरापर्यंत अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन !


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मार्च २०२० पासून देशभरात कोरोना या विषाणूजन्य आजाराने धुमाकूळ घातला होता कोरोना संक्रमणाच्या तब्बल २ वर्षाच्या काळानंतर यावर्षी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बल्लारपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बल्लारपूर शहरातील नगर परिषद परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात भल्या पहाटे पासूनच आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती विशेष बाब म्हणजे यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी व नतमस्तक होण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बल्लारपूर शहरातही अनेक बौध्द विहार ही निळ्या पताकानी सजली होती इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी महामानवाच्या कट आऊट आकर्षक स्वरूपात सजविण्यात आले होते महामानवाच्या जयंतीनिमित्त  नगर परिषद चौक परिसरात बल्लारपूर मेडिकल असोसिएशन च्या वतीने सकाळी १०:०० वाजतापासून सरबत वितरण करण्यात यते होत, तर भारतीय जनता पार्टी बल्लारपूर च्या वतीने सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास सरबत वितरण व विविध पदार्थाचे वितरण करण्यात आले.

         महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पासून पथसंचलन करण्यात येवून नगर परिषद बल्लारपूर परिसरातील बाबासाहेबांच्या स्मारक  परिसरात महामानवाला अभिवादन करण्यात आले तसेच नगर परिषद बल्लारपूर, तहसील कार्यालय बल्लारपूर, पोलीस स्टेशन बल्लारपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय बल्लारपूर, ई सह विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयात महामानवाला जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, सह अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले. १३१ व्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्थांनी भोजनदान, सरबत वितरण, थंड पिण्याचे पाणी, मिठाई वाटप करण्यात आली होती रात्री उशिरापर्यंत शहराच्या अनेक परिसरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मिरवणुकीच्या स्वरूपात अनुयायी येत होते. यावेळी बल्लारपूर पोलीस विभागाच्या वतीने सकाळी ६:०० वाजता पासून तर रात्री उशिरा पर्यत चोख व्यवस्था राखण्यात आली होती.



Post a Comment

0 Comments