यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र वितरण

 



यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र वितरण



चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : पात्र लाभार्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सातत्याने प्रयत्न केल्या जात असुन हजारो नागरिकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. दरम्यान आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात 25 नागरिकांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणा-र्या विविध योजनांचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
    यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्यांक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन,  विश्वजित शाहा, विलास सोमलवार, करणसिंह बैस, तापोष डे, नितीन शाहा, देवा कुंटा, राम जंगम, नरेश आत्राम, रुपेश मुलकावार, सिध्दार्थ मेश्राम, अजय मेश्राम, महेश चहारे, अनिरुध्द धवने, चंद्रशेखर देशमुख, दुर्गा वैरागडे आदिंची उपस्थिती होती.
   मतदार संघातील पात्र नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्या नुसार यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. आज घडीला यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन हजारो नागरिकांना सदर योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. यात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणा-र्या श्रावणबाळ, परितक्त्या, विधवा निवृत्ती पंेशन योजना, अपंग निवृत्ती पेंशन योजना, यासह इतर शासकिय योजनांचा समावेश आहे.
     दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांनी मागील दिड वर्षात जवळपास 480 नागरिकांना सदर योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. यातील 25 नागरिकांना आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मंजुरी आदेशचे प्रमानपत्र वितरीत करण्यात आले.  यावेळी  यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments