बल्लारपूरात समता पर्वाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन








बल्लारपूरात समता पर्वाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन  

◾९ एप्रिल ते १४ एप्रिल " समता पर्व "

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आपल्या आयुष्यात अनेक हाल अपेष्टा सहन करून प्रसंगी समाजात असलेल्या अनेक अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा ना छेद देऊन उभ्या आयुष्यात समतावादी विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या महापुरुषांची जयंतीच्या निमित्ताने बल्लारपूर शहरात समता पर्वा च आयोजन करण्यात आलेलं आहे येत्या ९ एप्रिलला प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची जयंती, ११ एप्रिल ला क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती, तसेच १४ एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती च्या निमित्तानं बल्लारपूर शहरातील भिमा-कोरेगाव विजयस्तभं, परिसरात जयभीम चौक, विद्यानगर वार्ड बल्लारपूर येथे प्रियदर्शी सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बल्लारपूर च्या वतीने समता पर्वाच आयोजन करण्यात आलं आहे.

        या निमित्तानं ९ एप्रिलला सकाळी ८:०० वाजता सम्राट अशोक जयंती निमित्तानं धम्मध्वजारोहन व अभिवादन, तर ११ एप्रिल २०२२ ला दुपारी १२:०० वा महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कव्वाल मनोजराजा गोसाई, यवतमाळ, विकासराजा, काटोल, आकाशराजा, उमेश बागडे, सुषमा बारसागडे, राणी तब्बसुम नागपूर यांचा बहारदार कार्यक्रमाचं आयोजन तर रात्री ८:०० वा. ' मी रमाई बोलतेय'  सांची संजय जिवने यांचं एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिल ला सकाळी ११:०० वाजता बळी खैरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी सम्मेलनाच आयोजन करण्यात आलं आहे यात प्रामुख्याने कविवर्य खेमराज भोयर, नरेंद्र सोनारकर, मधु बावतकर, मनोजराजा गोसाई, किशोर मुगल, नरेश बोरीकर, संजय ओरके, प्रा.सुब्रतो दत्ता, प्रशांत ढोरे, योगिता रायपुरे, शाहिदा शेख यांच्यासह अनेक कवी उपस्थित राहणार आहेत तर अशोक भगत यांची(एक प्रखर मुलाखत - (अशोकाच्या गिताला रुसवा चा साज)  तर सायंकाळी ५:०० वाजता डॉ.समीर कदम पुसद यांचं व्याख्यानाच आयोजन केले आहे  तर सायंकाळी ७:०० वाजता आयु.चरण जाधव मुंबई यांचं जलशा सादर करण्यात येईल. १४ एप्रिल २०२२ ला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन व सायंकाळी ६:०० वा संयुक्त अभिवादन रॅली च आयोजन करण्यात आलं आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आयोजन उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments