पुनीत सागर अभियान अंतर्गत एन.सी.सी. कैडेट्स द्वारे वर्धा नदी पात्रा ची स्वच्छता

 



पुनीत सागर अभियान अंतर्गत एन.सी.सी. कैडेट्स द्वारे वर्धा नदी पात्रा ची स्वच्छता


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय व गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपुर द्वारा वर्धा नदी पात्रा ची स्वच्छता करण्यात आली. 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा च्या वतीने कमांडिंग ऑफिसर कर्नल वि. बी. भास्कर आणि प्रशासनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल गौस बेग यांच्या मार्गदर्शनात 'पुनीत सागर अभियान' राबविन्यात आले. या अभियानाचा उद्देश, स्थानिक नागरिक आणि युवा पिढीला वेगवेगळे  समुद्री तट आणि नदी पात्रा ची स्वच्छता करने महत्वपूर्ण  आहे हा जनजागृती चा  संदेश देणे आहे.

जागतिक वसुंधरा दिवस च्या औचित्य हे आयोजित केले महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपुर यांच्या संयुक्त विद्यामनाने पुनीत भारत अभियान चे आयोजित करण्यात आले यात दोन्ही महाविद्यालय यातील अनुक्रमे 45 आणि 32 एनसीसी कॅडेट्स तसेच 10  माजी एन.सी.सी. अलूमनी कॅडेट्स आणि 2 एन सी सी अधिकारी, प्राध्यापक, स्थानीय नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या अभियानात सर्वांनी बल्लारपूर शहरातील गणपती घाट परिसर, वर्धा नदी पात्रातील कचरा,प्लास्टिक, शिरविलेले पूजा साहित्य, फोटो, इकॉर्निया, वाढलेले वनस्पती काढून पात्राची स्वच्छता करण्यात आली. काढलेला कचऱ्याची नगरपालिका स्वच्छता विभागा मार्फत उचलण्यात आला. यात वेगवेगळ्या विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले.

      महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती कल्याणी पटवर्धन आणि गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बहिरवर सर यांचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. महेशचंद शर्मा आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट योगेश टेकाडे यांनी 'पुनीत भारत अभियाना' ची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. तसेच दोन्ही महाविद्यालयाचे सीनियर कॅडेटस् यांनी या शिबिराचे आयोजन तथा यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान केले.

Post a Comment

0 Comments