राम नवमी निमित्य निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

 





राम नवमी निमित्य निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

  ◾शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांसाठी गांधी चौकात फळ वाटप


  चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राम नवमी निमित्य शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रे चे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामुख्यतेने उपस्थिती होती. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फळ वाटप करत राम नवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.

     यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महागनगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता,  यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, भाग्यश्री हांडे,आशा देशमुख, कल्पना शिंदे, वैशाली मेश्राम,  सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, विमल कातकर, सोनाली आंबेकर, हेमलता पोईनकर, भुवनेश्वरी धर्मपुरीवार, सरोश चांदेकर, अस्मिता डोणारकर, चंद्रशेखर देशमूख, रोशेद हुसेन, नकुल वासमवार, विश्वजित शाहा, हेरमन जोसेफ, गौरव जोरगेवार, करणसिंह बैस, आनंद रणशुर, नितिन शाहा,  राम जंगम, नितेश गवळे, तापोष डे, देवा कुंटा, राहुल मोहुर्ले, मुन्ना जोगी, प्रकाश पडाल आदींची उपस्थिती होती.

    दरवर्षी प्रमाणे यंदाही राम नवमी निमित्य श्री राम शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शोभायात्रा गांधी चौकात पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेतील प्रभु राम यांच्या प्रतिमेला आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पहार अर्पण करुन पुजा केली. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांसाठीही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पिण्याचे पाणी फळांची  व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रेत स्वागत केल्या नंतर आमदार किशोर जोरगेवार आणि यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेही शोभायात्रेत सहभागी झालेत.




Post a Comment

0 Comments