न.प.बल्लारपूर शहरातील वसंत सार्वजनिक वाचनालय ४ एप्रिल पासून विद्यार्थ्याच्या सेवेत





न.प.बल्लारपूर शहरातील वसंत सार्वजनिक वाचनालय ४ एप्रिल पासून विद्यार्थ्याच्या सेवेत

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहर हे मिनी इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे या शहरात विविध जाती, धर्म व पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात. विशेष म्हणजे सद्यस्थितीत बल्लारपूर शहराचा विचार केला तर वर्तमान काळात स्पर्धा परिक्षेचे युग आहे त्यामुळं वाचन संस्कृती ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे मार्च २०२० पूर्वी बल्लारपूर शहरातील एकमेव शासकीय वाचनालय म्हणून वसंत सार्वजनिक वाचनालयाची ओळख होती विशेष बाब म्हणजे या ठिकाणी केवळ विद्यार्थी-विद्यार्थिनीच नव्हेच वरिष्ठ नागरिकांसोबत अनेक शासकीय अधिकारी सुध्दा आपली वाचनाची भूक भागविण्यासाठी येत होते या वाचनालयात विविध प्रकारची वृत्तपत्र, साप्ताहिके, मासिके नागरिकांना उपलब्ध व्हायची पूर्वी सदर वसंत सार्वजनिक वाचनालय हे आठवडी बाजारातील अग्निशमन केंद्र लगतच्या परिसरात होते मात्र आता बल्लारपूर शहरातील वसंत सार्वजनिक वाचनालय हे नव्या स्वरूपात नवीन ठिकाणी ( डॉ.कल्लूरवार रुग्णालय लगत, स्वास्थ्य विभाग कार्यालय, गणपती वार्ड, बल्लारपूर ) सुरू होत आहे पूर्वी या वसंत सार्वजनिक वाचनालयाची वेळ सकाळी १०:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत असायची मात्र आता सदर वाचनालय आता विद्यार्थ्याचा विचार करता येत्या ४ एप्रिल पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी ६:०० ते रात्री १०:०० पर्यंत तर शनिवारला सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० पर्यंत सुरू असणार आहे तरी विद्यार्थ्यानी या वाचनालयाचा    वापर करून देशातील उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी करावा असे आवाहन मा.विजयकुमार सरनाईक मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments