२५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात १ कोटी रू. किंमतीची विकासकामे मंजूर.

 




२५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात १ कोटी रू. किंमतीची विकासकामे मंजूर.

◾आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी, ऊर्जानगर आणि लखमापूर या परिसरात १ कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी मिळाली आहे. 

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्‍या दिनांक ३१ मार्च २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये २५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत सदर १ कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी देण्‍यात आली आहे. यात प्रामुख्‍याने चंद्रपूर तालुक्‍यातील लखमापूर येथील श्री हनुमान परिसराला संरक्षण भिंतीचे बांधकाम व सौंदर्यीकरण करण्‍यासाठी ६० लक्ष रू., बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी येथील माजी मालगुजारी तलावाचे सौंदर्यीकरण करून बागेची निर्मीती करण्‍यासाठी २० लक्ष रू, आणि ऊर्जानगर प्रभाग क्र. १ मधील केसरीनंदन हनुमान मंदिराच्‍या मागील ओपनस्‍पेसमध्‍ये संरक्षण भिंतीचे बांधकाम व सौंदर्यीकरण करण्‍यासाठी २० लक्ष रू. असा एकूण १ कोटी रू. निधी सदर विकासकामांसाठी मंजूर करण्‍यात आला आहे.

या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने २५१५ या लेखाशिर्षाअंतर्गत अनेक विकासकामे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात मंजूर करण्‍यात आली आहे. या शिवाय खनिज विकास प्रतिष्‍ठान अंतर्गत प्राप्‍त निधीतुन सुमारे १५ ते २० कोटी रू. किंमतीची कामे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात मंजूर करविली आहेत.

Post a Comment

0 Comments