जन्मदात्या आईवर प्राणघातक हल्ला !

 











जन्मदात्या आईवर प्राणघातक हल्ला !

◾वाट्याला जास्त शेतजमीन यावी या हेतूने सावत्र भावांनी, सावत्र आई वर जीवघेणा हल्ला

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : प्रसिध्द आंबेडकरी कवी वामनदादा कर्डक यांच्या कवितेतून " माय म्हणजे माय असते, दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगळ्याचा पाय असते, माय असते जन्माची शिदोरी ती सरतही नाही  आणि उरतही नाही." पण आता त्याच माय च दुःख जन्मभर सरत नाही उलट जन्मदाती मुलं माय च्या जीवावर उठतात अशीच एक घटना राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली आपल्या वाट्याला जास्त शेतजमीन यावी या हेतूने सावत्र भावांनी, सावत्र आई वर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आई ही गंभीर जखमी झाली तर भाऊ पळून गेल्यामुळे त्याचा जीव वाचला. याविषयीच्या अधिक माहितीनुसार राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथे रतन दाऊ ताकसांडे यांचे २० एकर शेतजमीन व घर आहे मात्र २ वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता दाऊ ताकसांडे यांना २ पत्नी होत्या पहिल्या पत्नीला तीन मूल तर दुसऱ्या पत्नीला एक मुलगा आहे दुसरी पत्नी आपल्या मुलासह तेलंगांना राज्यात राहते मात्र शेतीच्या कामासाठी लक्ष्मी रतन ताकसांडे, वय-४८, व मुलगा व्यंकटेश ताकसांडे वय-३० डोंगरगाव ला आले असता सावत्र भावांनी या दोघांनाही जीवे मारण्याचा बेत रचला यानुसार दि.०७ एप्रिलला फराळाचे निमित्ताने घरी बोलावून शेतजमिनीचा वाद घातला व धारदार शस्त्राने मुलावर वार करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखत व्यंकटेश ने आपला जीव वाचवला मात्र या सावत्र भावांनी आईला बेदम मारहाण केली शस्त्राने मानेवर व चेहऱ्यावर वार केले त्यामुळं ती गंभीर जखमी झाली मुलांच्या हातात शस्त्र असल्यामुळे कुणीही मदतीला आले नाही अखेर या घटनेची माहिती पोलिसांना कळताच विरुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले या प्रकरणात आरोपी दीपक ताकसांडे, वय-३५, व फुलवंत ताकसांडे, वय-३८ या दोघांना अटक केली असून त्यांचे विरुध्द भांदवि कलम ३०७, ५०६, ५०४, ३४ व शस्त्र अधिनियम १९५९ च्या २५,४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विरुर ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भुजंग कुलसंगे, सचिन खैरे, सूर्यभान मार्कन्डे, विजय मुंडे,  मडावी नरगेवर करीत आहे.





Post a Comment

0 Comments