वरोरा तालुका पेन्शनर्स च्या आमसभेत नविन कार्यकारिणी ची निवड .

 



वरोरा तालुका पेन्शनर्स च्या आमसभेत नविन कार्यकारिणी ची निवड .

◾अध्यक्ष पदी देवाळकर, सचिव पदी कांबळे.

  वरोरा ( राज्य रिपोर्टर ) :  वरोरा तालुका पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशन ची  आमसभा व कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीचे आयोजन मा.सहाय्यक धर्मदाय आयुक्त नं.१ चंद्रपूर यांच्या आदेशानुसार श्री अंबादेवी देवस्थान ,अंबादेवी वार्ड वरोरा येथे करण्यात आले होते.त्यात १५ नविन संचालक मंडळाची अविरोध निवड करण्यात आली. त्यात आबाजी मारोती देवाळकर यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी देवराव झिबलाजी  कांबळे यांची अविरोध निवड करण्यात आली.आमसभेचे अध्यक्षस्थानी व्ही.जी.सोनेकर  ऊपस्थीत होते.

   वार्षिक आमसभेत १७ एप्रिल २०२१ ते १६ एप्रिल २०२७ पर्यंतची नवीन कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत आजीव  सभासद मतदारांनी भाग घेतला.

निवडणूक ही आवाजी पद्धतीने पार पडली. पेन्शनर्स असोसिएशन संस्थेच्या  कार्यकारी मंडळात पंधरा सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यात प्रामुख्याने ऊपाध्यक्ष पदी तुळशिराम झामलाजी  विरूटकर , सहसचिव पदी दत्तात्रय तात्याजी आस्वले, कोषाध्यक्ष पदी देवराव  पांडुरंग पारखी, याशिवाय  संचालक सदस्य पदीप्रा. दिनकर बापुराव राऊत, सुरेश लक्ष्मण बरबटकर , नामदेव लहानुजी काळे,सिताराम मारोतराव पाल,प्रा.राजेश पांडुरंगजी कावलकर, प्रा.वसंतराव बाजीराव माणूसमारे,श्रीमती शशिकला शांताराम पोईनकर,श्रीमती सिंधु सखाराम ऊत्तरवार,सौ.दुर्गा रमेश ठाकरे,सौ.मिरा मेघराज वानखेडे यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून महेश डोंगरे तथा निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून  गोविंद रजपूत यांनी कामकाज सांभाळले.सर्व नवनिर्माण संचालक मंडळाचे आमसभेतील सदस्यांनी अभिनंदन केले.

आमसभेचे अध्यक्ष व्ही.जी.सोनेकर यांनी पेन्शनर्स असलेल्या जेष्ठ नागरिकांना सोयीसुविधा प्राप्त करून देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे असे मनोगत व्यक्त केले.

 आमसभेत दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभासदांच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर चर्चा करुन निराकरण करण्यात आले. आमसभा यशस्वी करण्यासाठी देवराव कांबळे, नामदेव काळे, एम.के.मगरे, ,अशोकुमार पाठक,श्रीमती अजंना पुसदेकर,श्रीमती लीला लोणारे, श्री.अ.ग.बुराणसर, रा.तु.पावडे, ए.बी.शेख,व संघटनेच्या सर्व संचालकानी  सहकार्य केले.संघटनेच्या आजीव सभासदांनी निवडणूक प्रक्रिया अविरोध केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आबाजी देवाळकर यांनी सर्व पेन्शनर्स सदस्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments