समाजासाठी तळमळीने झटणा-या निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजप मुकली

 



समाजासाठी तळमळीने झटणा-या  निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजप मुकली

◾वरोरा येथील भाजप नेते सतीश दांडगे यांच्या निधन वार्तेवर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची प्रतिक्रिया



 चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) :   भाजप हा राष्ट्रभक्ती, समाजकारण यासाठी द्योतक असलेला पक्ष असतांना सतीश दांडगे सारख्या समाजासाठी तळमळीने झटणा-या  निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजप मुकली असल्याची भावनिक प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. 

    सतीश दांडगे हा मागील अनेक वर्षांपासून आपल्या सोबत राजकारणात असून परिवार सांभाळून राजकारणाच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी कणखर भूमिका व प्रयत्नांची पराकाष्टा या व्दिसूत्रीतून कार्य करतांना मी त्याला बघितले आहे असे यावेळी अहीर यांनी सांगितले. वरोरा तालुक्यात पक्षाची समर्थपणे सांभाळत येथील व्होल्टाज उद्योगातील कर्मचारी तसेच कामगार यांच्या न्यायहक्कासाठी दिलेल्या लढ्यात सतीश दांडगे यांचा मोलाचा सहभाग होता. आपल्या राजकीय कारकिर्दीत जनहितार्थ केलेल्या अनेक उपक्रमात, आंदोलनात व मोर्चांमध्ये सतीश आपल्यासोबत उभा असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगितले. 

      सतीश दांडगे या निधना पश्चात त्यांच्या परिवारासोबत आपल्या सांत्वना असून त्याच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे असे भावोदगार पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी काढले.

Post a Comment

0 Comments