चंद्रपूर शहराच्या मध्यभागी प्रसिद्ध अशा जयंत सिनेमा गृहावर जप्तीची कारवाई

 



चंद्रपूर शहराच्या मध्यभागी प्रसिद्ध अशा जयंत सिनेमा गृहावर जप्तीची कारवाई 

◾५ कोटी ३० लाखाचे कर्ज घेतले ती रक्कम ब्याजासह ८ कोटी झाली.

◾पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या व आजाद बगीचा समोर असलेल्या मनोरंजन क्षेत्रात अलौकिक मिळविलेल्या जयंत सिनेमागृहावर कथित आर्थिक संकट आल्याच्या देखावा करण्यात आला आहे. यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव बँकने जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी जयंत टॉकीज वर जप्तीची कारवाई केली. असून नऊ (९) भाडेकरू दुकानांच्या ताबा सुद्धा बँकेने घेतला आहे . या कारवाही मुळे व्यापारी क्षेत्रासोबत मनोरंजन वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे .

चंद्रपूरातील जयंत टॉकीज ला परिचयाची आवश्यकता नाही. जयंत मामिडवार ह्यात असताना त्यांनी या सिनेमागृहला नाव मिळवून दिले होते. कालांतराने घराघरात टीव्ही आल्या .त्यामुळे पडद्यावरील सिनेमा पाहणे कमी झाले . आणि सिनेमागृहला उतरती कळा पडू लागली. जयंत टॉकीज सुद्धा यातून सुटलेली नाही. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी हे सिनेमागृह आहे. जयेश मामिडवार आणि जयश्री मामिडवार हे या सिनेमागृह चे मालक आहे. या भूखंडावर सिनेमागृह आणि जयेश मामिडवार व जयश्री ममिडवार यांचे घर सुद्धा आहे. जयेश आणि जयश्री यांनी या भूखंडावर दहा वर्षांपूर्वी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव बँकेतून सुमारे पाच कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. एकच कर्ज नाही तर पाच कर्ज आहे. नियमित पणे बँकेचे कर्ज न भरल्याने आता या कर्जाची रक्कम व्याजासह सुमारे आठ कोटी झाली. गेल्या मार्च अखेर ममिडवार कुटुंबीयांनी दोन (२) कोटी रुपये भरले आहे. दरम्यान बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्यामुळे जप्तीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्तात सोमवारी दुपारी बँकेने ताबा घेतला आहे. मात्र कर्मचाऱ्याने न्यायालयाचा आदेश दाखविला.  आणि जप्तीची कारवाही होईलच अशी ताठर भूमिका घेतली. याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. एकूणच चंद्रपुरातील या जप्तीच्या कारवाई मुळे मनोरंजन क्षेत्रासह व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.



Post a Comment

0 Comments