प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे मंजुर करण्यात आलेल्या लाभार्थांना शेवटचा हप्ता तात्काळ द्या यंग चांदा ब्रिगेडची मागणी

 











प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे मंजुर करण्यात आलेल्या लाभार्थांना  शेवटचा हप्ता तात्काळ द्या  यंग चांदा ब्रिगेडची मागणी

◾मनपा आयुक्तांना निवेदन


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे मंजुर करण्यात आलेल्या लाभार्थांना  शेवटचा हप्ता तात्काळ द्या अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असुन सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजित शाहा, तापोष डे, हेरमन जोसेफ, नितीन शाहा, विनोद अनंतवार, देवा कुंटा, आनंद रणशूर, आनंद इंगळे, नितेश गवळी आदिंची उपस्थिती होती.
 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थांना  लाभ देण्सायाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्या नुसार कागदपत्राची पडताळणी करीत शहरातील अनेक वस्त्याच्या प्रात्र लाभार्थांना  अधिकृत घरकुल मंजुर होवुन घराचे बांधकाम देखिल सुरू झाले आहे.
मात्र आर्थिक वर्षे 2018-19, 2019-20, 2020-21 या कालावधीत घरकुल मंजुर होवूनही आजतागायत त्यांना शेवटचा हप्ता न मिळाल्यामुळे लाभार्थांच्या  घराचे बांधकाम पुर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे सदर लाभार्थी कुटंुबांना नाईलाजाने भाड्याची खोली करून राहावे लागत आहे. गरीबाला घर देणारी योजनाच  दिवास्पप्न ठरत असेल तर योजना कोणत्या कामाची असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे या विषयाची गर्भीरता लक्षात घेवुन आठ दिवसात उर्वरीत रक्कम लाभार्थांच्या खात्यावर वळवावी. अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून मनपा आयुक्तांना करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास सर्व अन्यायग्रस्थ लाभार्थांना  सोबत घेवून महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. 



Post a Comment

0 Comments