वृत्तपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला,या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी नागपुरात उपचार सुरू

 


वृत्तपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला,या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी नागपुरात उपचार सुरू

◾ पत्रकारावर भ्याड हल्ला 

वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून पत्रकारिता समजली जाते तसेच समाजातील घडणाऱ्या अनेक लहान मोठ्या घटनांना उजेडात आणण्याचं काम पत्रकार करतो मात्र तोच पत्रकार आता सुरक्षित राहिलेला नाही नुकत्याच जानेवारी २०२२ मध्ये बुलढाणा येथे एका पत्रकारावर हल्ला झाला होता त्याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली की काय असा प्रश्न वर्धकर जनता विचारत आहे. 

वर्ध्यातील एका वृत्तपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर टी पॉईंटवर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

 वर्ध्यातून सेलूला जात असतेवेळी कार अडवून अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी कारचालकासह वृत्तपत्राच्या संपादकांनाही मारहाण करण्यात आली. तर गाडीचीही तोडफोड केली गेली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत गुन्हाही नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत. वर्ध्यात या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका का करण्यात आला, ह कळू शकलेलं नाही.

प्राणघातक हल्ला झालेली व्यक्त कोण? वर्ध्याच्या दत्तपूर टी पॉईंट वर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात रवीद्र कोटंबकर हे गंभीर जखमी झाले. रवींद्र कोटंबकर हे वर्धामधील एका वृत्तपत्राचे संपादक आहेत.

नेमका हल्ला कसा झाला?

वर्ध्यावरुन कोटंबकर हे सेलूला जात होते. त्यावेळी अज्ञातांनी कार अडवली आणि कोटंबकर यांना मारहाण केली. तसंच कोटंबकर यांच्या ड्रायवरलाही मारहाण करत गाडीची सुद्धा तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात कोटंबकर यांच्या डोक्यावर, पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. एकूण १० ते १२ हल्लेखोरांनी मिळून ही मारहाण केली असल्याची माहित समोर आली आहे. सध्या जखमी कोटंबकर यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात सुरु उपचार आहेत. सेवाग्राम पोलिसांत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या हल्लाप्रकरणी आता अधिक तपास केला जातो आहे. कलम ३०७, १४३,१४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच अज्ञात हल्लेखोर आरोपींच्या शोधात पोलिसांची पथकं रवाना केली आहेत. या हल्लेखोरांना पकडण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

Post a Comment

0 Comments