भगवान झुलेलाल जयंती निमित्य काढण्यात आलेल्या शोभयात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

 





भगवान  झुलेलाल   जयंती निमित्य काढण्यात आलेल्या शोभयात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

  • शोभायात्रेत सहभागी झालेल्यांसाठी यंग चांदा ब्रिग्रेडने केली शितपेयाची व्यवस्था

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : भगवान झुलेलाल जयंती निमित्य सिंधी समाज बांधवांच्या वतीने शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या सिंधी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहराध्यक्ष पंकज गुप्ता, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, चंद्रशेखर देशमुख, शहर संघटक रुपेश पांडे, विलास वनकर, हेरमन जोसेफ, आनंद रणशूर आदिंची उपस्थिती होती.
         सिंधी समाजाचे आराध्य दैवात भगवान  झुलेलाल साई यांच्या जयंती निमित्य दरवर्षी प्रमाणे यंदाही सिंधी समाज बांधवांच्या वतीने शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. दरम्याण कसतुरबा मार्गावर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी भगवान झुलेलाल साई यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत पूष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रंगी शोभायात्रेत सहभागी सिंधी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर शोभायात्रेत सिंधी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments