आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमिपूजन

 





आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमिपूजन

    चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातुन मंजूर शहर व ग्रामीण भागातील विविध कामांचे भुमिपुजन आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळा दाताळा येथील प्रवेशद्वार व रस्त्याचा, बाबूपेठ आणि इंडस्ट्रियल प्रभाग येथील क्राँक्रिट रोडच्या कामांचा समावेश आहे.

        या भुमिपुजन सोहळ्याला यंग चांदा ब्रिगेडचे शहराध्यक्ष पंकज गुप्ता, दाताळाचे सरपंच रविंद्र लोनगाडगे, यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, नगर सेविका पुष्पा मुन, नगर सेवक स्नेहल रामटेके, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सोनल भगत, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते राम जंगम, सतनामसिंग मिरधा, करणसिंह बैस,  नितिन शाहा, दाताळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बंडु मत्ते, ग्रामपंचायत सदस्य जिवन निमगडे, मंगला डांगे, मंदा काळे, प्रतिभा ढुमने, वर्षा मंुगुले, लता मदनकर, संगीता देशकर, विजयालक्ष्मी नायर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितिन मोहुर्ले, उपाध्यक्ष दिपाली मुंगेले . आदिंची उपस्थिती होती.

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतुन शहर व ग्रामिण भागातील विकास कामे केली जात असून या निधीतून अनेक वर्षांपासून प्रंलबित असलेल्या कामांना गती प्राप्त झाली आहे. या निधीचा वापर लोकांसाठी आवश्यक असलेल्या कामांसाठी केला असून मुलभुत सोयी सुविधांवर भर देत ते कामे पुर्ण करण्यासाठी सदर निधी वापरला जात आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांने खनिज, 25/15 आणि आमदार निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. यात खनिज निधी अंतर्गत २५ लक्ष रुपये निधीतून जिल्हा परिषद शाळा दाताळ येथे प्रवेशद्वार व रस्त्याच्या बांधकाम भूमिपूजन. खनिज निधी अंतर्गत २० लक्ष रुपये निधीतून बाबुपेठ प्रभाग क्र. १३ येथे मंजूर सिमेंट क्राँक्रिट रस्त्याचे आणि  इंडस्ट्रियल प्रभाग येथील सिमेंट क्राँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. चंद्रपूरातील शहरातील अनेक भागांचा अद्यापही अपेक्षित असा विकास झालेला नाही. त्यामुळे अशा दुर्लक्षित भागातील विकासकामांकडे आमचा भर आहे. बापुपेठ, इंदिरा नगर, किष्णा नगर, संजय नगर या भागांचा सर्वसमावेशक विकास व्हावा या करिता माझे प्रयत्न सुरु असुन यासाठी मोठा निधी अपण उपलब्ध करुन दिला आहे. बाबुपेठ येथील अनेक रस्त्यांचे कामे आपण पुर्ण केली असून काही कामे प्रस्तावित आहे. त्या कामांचेही लवकरच भुमिपुजन करुन कामे सुरु केल्या जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले, सोबतच ग्रामिण भागांच्या विकासासाठीही आपण शासनाशी सातत्याने पाठपूरावा करत निधी उपलब्ध करुन दिला. यापुर्वी दाताळा येथील पाणंद रस्त्यांचे काम आपण पुर्ण केली आहे. आणखी येथील काही कामे प्रस्तावित असून ते ही लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरु असल्याचे भुमिपुजन कार्यक्रमात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.


Post a Comment

0 Comments