आमदार निधीतून साडे सहा लक्ष रुपयांची पुस्तके व संगणक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिकेला वितरित

 



आमदार निधीतून साडे सहा लक्ष रुपयांची पुस्तके व संगणक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिकेला वितरित

 

◾दीड कोटी रुपयातून बाबूपेठ येथील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार - आ. किशोर जोरगेवार

    


 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिकेसाठी पुस्तके आणि संगणक उपलब्ध करून देता आले याचा आनंद आहे. सोबत या भागाच्या विकासावरही आमचा भर आहे. विविध निधी अंतर्गत येथील दीड कोटी रुपयांची विकासकामे आम्ही मंजूर केली आहे. लवकरच ती पूर्ण झालेली दिसेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     बाबूपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे येथील अभ्यासिकेसाठी आमदार निधी अंतर्गत साडे सहा लक्ष रुपायातून पुस्तके आणि संगणक देण्यात आले. आज रविवारी धम्मचक्र स्पोर्टिंग क्लब च्या वतीने सदर पुस्तक आणि संगणकाचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगर सेवक स्नेहल रामटेके,  नितीन रामटेकेजावेद सय्यद शहर पोलीस ठाण्यचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल आदींची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कीमतदार संघातील शेवटच्या विद्यार्थ्यांना उत्तम अभ्यास करता यावा हा आमचा मानस आहे. याकरिता आपण मतदारसंघात 11 अभ्यासिका तयार करत आहोत. यातील ६ अभ्यासिकेचे काम सुरूही करण्यात आले आहे.

       ज्या पवित्र दीक्षाभूमी वरून माणूस म्हणून जगण्याची दीक्षा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. त्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. येथिल विकासासाठी एकत्रित 100 कोटी रुपयांची मागणी आपण केली आहे. नुकतीच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमीसाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे तर कोटी रुपायातून आपण तेथे सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासिका तयार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

 बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती कार्यक्रमा प्रसंगी मी येथे आलो होतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी पुस्तक आणि संगणकाची कमी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर येथील अभ्यासिकेसाठी पुस्तक आणि संगणक उपलब्ध करून देण्याचा शब्द मी दिला होता. आज दिलेला शब्द पूर्ण करता आला याचा आनंद होत आहे. खरतर पुस्तकांची मागणी आमच्याकडे फार कमी येते मात्र येथील विद्यार्थ्यांनी ही मागणी केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांचेही मी कौतुक करतो. आज या अभ्यासिकेला पुस्तक उपलब्ध झाली आहे. या पुस्तकातील ज्ञानाचा उपयोग करत देशसेवेत आपले योगदान देण्याचे आव्हाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना केले. 

     शिक्षण क्षेत्रासह येथील विकासकामांसाठीही आपण प्रयत्न करत आहे. या अगोदर आपण येथील विकासकामांसाठी मोठा निधी दिला आहे. तर आता बाबूपेठ येथील  दीड कोटी रुपयांची विविध कामे मंजूर करण्यात आली. लवकर या कामांना सुरवात होणार आहे. आणि हा शेवट नाही. यापुढेही सांगाल ते काम करण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मचक्र स्पोर्टिंग क्लबच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments