नांदेडमध्ये भरदिवसा गोळीबार प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक संजय बियांनीची हत्या

 







नांदेडमध्ये भरदिवसा गोळीबार प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक संजय बियांनीची हत्या

नांदेड ( राज्य रिपोर्टर ) : नांदेड मध्ये प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक संजय बियांनी आज सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या घरासमोरच दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला या घटनेत संजय बियाणी व त्यांचा चालक गंभीर जखमी झाला मात्र उपचारादरम्यान बियांनीचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे याविषयीच्या अधिक माहितीनुसार सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान संजय बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील आपल्या घराबाहेर पडताच दुचाकीवरून आलेल्या २ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर ३ ते ४ गोळ्या झाडल्याचा अंदाज आहे मात्र दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे नांदेड शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते बियाणी यांचेवर गोळीबार होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तीन वर्षांपूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंडाकडून धमकी मिळाली होती या पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात अली होती मात्र सुरक्षा ही काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती विशेष म्हणजे संजय बियाणी हे नांदेड मधील मोठे व्यावसायिक असून त्यांना खडणीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून तर त्यांच्यावर गोळीबार झाला नाही ना? असाही प्रश्न निर्माण झाला आहे घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेचे काही फुटेज तर नाही ना याचा शोध पोलीस घेत असून या घटनेने नांदेड मधील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून या हत्याकांड नंतर नांदेड मधील व्यावसायिक वर्गात घबराट निर्माण झाली आहे.




Post a Comment

0 Comments