लोखंडी फावड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी रक्तस्राव झाल्याने मृत



लोखंडी फावड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी रक्तस्राव झाल्याने मृत 

 ◾कुत्र्याच्या ह्या शुल्लक  कारणाने या दोन्ही कुटुंबीयात बाचाबाची एकाचा खून

◾धक्कादायक घटना राजुरा तालुक्यातील पंचाळा या गावात घडली.

 

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : शुल्लक कारणामुळे शेजारी राहणाऱ्या कुटुंब याचा  बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्या लोखंडे पावल्याने डोक्यावर मारून एकाचा नहात जीव गेल्याची धक्कादायक घटना राजुरा तालुक्यातील पंचाळा या गावात घडली.

मिळालेल्या माहिती अनुसार पांचाळ  येथे ड्रायव्हरी इचे काम करणारे गणेश मडावी वय 35 हे सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान कामावरून आल्यावर त्यानी त्यांच्या घरातील पाळाव बांधलेली कुत्रे सोडले व अंघोळीला गेले. ते पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे चे यांचे अंगणात गेली. भोंगळे कुटुंबाने कुत्र्याला हटकले. कुत्र्याच्या ह्या शुल्लक कारणाने या दोन्ही कुटुंबीयात बाचाबाची झाली. 

त्यामुळे अगोदरच त्या कुटुंबासोबत यांचे पटत नसल्याने मडावी याने भोंगळे यांचे घरी जाऊन कुत्र्याला हाकलून लावल्याचे शुल्लक कारणावरून भांडायला सुरुवात केली. यावेळी गणेश मडावी व  प्रभाकर भोंगळे एका - एका च्या  कॉलर पकडून जातीवाचक शिवीगाळ झाली, बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यातच प्रभाकर भोंगळे यांनी गणेश मडावी यांचे दोन्ही हात पकडले  त्यांना मारहाण करायला सुरुवात केली वडिलाला माऱ्हान होऊ लागल्याने मुलगा रोहित संतापला तो धावून आला संतापलेल्या मुलाने घरी बांधकाम साहित्य जवळ पडून असलेल्या पावडे उचलले आणि मडावी याचे डोक्यात घातले एकच वार आत तो खाली पडला त्याला लगेच राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने रुग्णालयात नेत असताना मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला रुग्णालयात गंभीर जखमी मडावी याला भरती केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना त्याला मृत घोषित केले.गुरुवार दिनांक 21 एप्रिल ला सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास घडली. 

मृतकाच्या पत्नी सुनिता गणेश मडावी, मृतकाचे आई गीताबाई  मारोती मडावी, मृतकाचे भाऊ धनराज मारोती मडावी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 302,504,506,34,  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989, 3(1) (S), 3(2)(5) अन्वये गुन्हा  दाखल केला असून आरोपी प्रभाकर भोंगळे वय 52,  रोहित  भोंगळे वय 21, ताराबाई प्रभाकर भोंगळे वय 45 व त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला अटक केली आहे. समोरील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात विरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करीत आहे.


Post a Comment

0 Comments