आकाशातून पडलेल्या आगीच्या गोळ्या व रिंगा च्या तपासणी साठी इस्रोचे २ सदस्यीय पथक चंद्रपुरात दाखल !

 








आकाशातून पडलेल्या आगीच्या गोळ्या व रिंगा च्या तपासणी साठी इस्रोचे २ सदस्यीय पथक चंद्रपुरात दाखल ! 

◾तपासणीसाठी सर्व वस्तू ताब्यात घेतल्या लवकरच तथ्य समोर येईल

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे शास्त्रज्ञ चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. २ एप्रिल रोजी लाखो लोकांनी आकाशात आगीचे लोळ बघितले होते. यातील वस्तू स्वरूपात सिंदेवाही परिसरात एक धातूची रिंग व सहा गोळे सापडले होते. नागरिकांत दहशत पसरली असताना जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतर इस्रोचे पथक ६ दिवसांनंतर सिंदेवाही व लाडबोरी येथे दाखल झाले. शाहजहान एम. आणि मयुरेश शेट्टी या दोन शास्त्रज्ञांच्या चमूने संपूर्ण वस्तूंची पाहणी केली. इस्रोच्या वाहनातून या सर्व वस्तू तपासणीसाठी नेल्या जाणार आहेत. त्याचे परीक्षण केल्यानंतर या वस्तूबाबत नेमका अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तळोधी तलावाच्या काठावरही सापडली धातूची

चंद्रपूर जिल्ह्यात कोसळलेल्या सॅटेलाईटचे दोन दिवसांपूर्वी अवशेष आढळले. चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या खडसंगी बफ्फर झोनमधील तळोधी (नाईक) परिसरातील तलावाच्या काठावर धातूची गोल वस्तू दिसले. या गोलाकार वस्तूवर तारासारखे आवरण आहे. हा गोलाकार अवशेष वजनाने हलका आहे. वनविभागाचे कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना गोलाकार वस्तू सापडली. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रम्हपुरी आणि चिमूर तालुक्यात कोसळलेल्या सॅटेलाईटचे सात अवशेष मिळाले आहेत.

तपासणीनंतर तत्थ्य येणार समोर या वस्तू नेमक्या कुठून आल्या. त्यात कोणते पदार्थ आहेत, हे अधिकृतपणे सांगण्यात आले नाहीत. त्यामुळं अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे शास्त्रज्ञ चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेत. त्यांनी या वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या. तपासणीनंतरच या वस्तू नेमक्या काय आहेत, हे सांगता येईल, असं वैज्ञानिकांनी सांगितलं. आकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे शास्त्रज्ञ चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. दोन एप्रिल रोजी लाखो लोकांनी आकाशात आगीचे लोळ बघितले होते. यातील वस्तू स्वरूपात सिंदेवाही परिसरात एक धातूची रिंग व सहा गोळे सापडले होते.




Post a Comment

0 Comments