भाजीपाल्याच्या वाडीत आढळले चक्क बिबट्याचे पिल्लू

 



भाजीपाल्याच्या वाडीत आढळले चक्क बिबट्याचे पिल्लू

 ◾ मूल तालुक्यातील उथळपेठ येथील घटना 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर )  : मूल तालुक्यातील उथळपेठ येथे आज दिनांक 28 एप्रिलला वामन किन्नाके यांच्या भाजीपाल्याच्या वाडीत चक्क बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 3:30 च्या सुमारास घटना घडली या घटनेची माहिती गावकऱ्याना कळताच याची माहिती वनविभागाला देण्यात आली वनविभागाने वेळीच बिबट्याच्या पिल्लूला जेरबंद केले. विशेष म्हणजे मूल तालुक्यातील वन्यजीवांचं मोठ्या प्रमाणावर वावर आहे. त्यातही चिचपल्ली या घनदाट असलेल्या परिसरातील उथळपेठ गाव असुन सदर गाव जंगलाला लागून असल्याने यालगत वामन किन्नाके यांचं शेत आहे तिथं भाजीपाल्याची वाडी असुन आज दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान जवळपास साडे तीन महिन्याचं बिबट्याचे पिल्लू आढळून आले या घटनेची माहिती वनविभाग व संजीवन संस्थेला देण्यात आली होती त्यानी घटनास्थळी येऊन बिबट्याला जेरबंद करून चंद्रपुरात पाठविण्यात आले विशेष म्हणजे घटनास्थळी गावकऱ्यानी गर्दी केली होती. सदर कारवाई वनरक्षक पि.एस.मानकर,वनरक्षक, शितल चौधरी, व वनमजूर सह क्षेत्र सहायक प्रशांत खनके, संजीवन संस्थेचे उमेशसिह झिरे, प्रभाकर धोटे ई ची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments