श्री बालाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्याय बामणी, बल्लारपुर विविध सांस्कुतिक कार्यकमाचे आयोजन.

 



श्री बालाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्याय बामणी, बल्लारपुर विविध सांस्कुतिक कार्यकमाचे आयोजन.


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : श्री बालाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्याय बामणी येथे दिनांक 19/04/2022 पासून विविध सांस्कुतिक कार्यकमाचे आयोजन. बामणी विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्वाचा विकास होणाच्या दृष्िकोनातून बालाजी कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर कायर्क्रमास उदघाटक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पंधरे मॅडम तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट चे सदस्य श्री. दिपक धोपटे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची  सुरवात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर  पुष्पमाला व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. पहिला दिवस फुगे फुगवा आणि फोडा अश्या कार्य्रमाअंतर्गत करण्यात आली.

सदर कार्यक्रमास श्री. वासाडे सर, श्री. महेस्कर सर ,श्री. राठोड सर यांनी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास एकूण 40विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक कु.दुर्गा मोरेश्वर डेरकर, द्वितीयक्रमांक हरशल नरेंद्र गिलबिले,  तृतीय क्रमांक अमन शंकर आत्राम यांनी पटकवला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.सोनटक्के सर यांनी केले .

बालाजी कला व क्रीडा महोत्सव हे 8 दिवसाचे ठरविले असून क्रिकेट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,गितगायान अश्या अनेक स्पर्धा आयोजन करण्यात आलेलं आहे  ...सदर कार्यक्रमास श्री रामटेके सर , घुंगुरुडकर सर मडावी सर आदींचे मोलांचे सहभाग होता .

Post a Comment

0 Comments