घुगरी वाटप करत यंग चांदा ब्रिगेडने नागरिकांना दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

 





घुगरी वाटप करत यंग चांदा ब्रिगेडने नागरिकांना दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

 
 चन्द्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : गुढीपाडवा निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आजाद बाग येथे घूगरी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायंकाळच्या सुमारास बागेत फिरायला येणा-र्या नागरिकांना घुगरी प्रसाद स्वरुपात देत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
 यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहराध्यक्ष पंकज गुप्ता, चंद्रशेखर देशमुख, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, शहर संघटक रुपेश पांडे, विलास वनकर, हेरमन जोसेफ, आनंद रणशूर आदिंची उपस्थिती होती.
   गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. आज संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूरातही गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. आज पासुन ग्रीष्म ऋतुला सुरवात झाली. तापत्या उन्हात स्वस्त राहण्यासाठी कडधान्य खा हा संदेश देण्यासाठी घुगरी खाण्याला आज विशेष महत्व आहे. त्यामुळे आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुगरी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बागेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संध्याकाळी बागेत येणा-र्या नागरिकांना घुगरीचे वाटप करत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांना गुडिपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आला.



Post a Comment

0 Comments