संसद परिसरात लकिशा बंजारा यांचा पुतळा उभारा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्या

 










संसद परिसरात लकिशा बंजारा यांचा पुतळा उभारा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्या

🔸राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  संसद भवन ज्या जागेवर उभे आहे. ती जागा बंजारा समाजाचे लकीशा बंजारा यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. बंजारा समाजाच्या या भूमीशी भावनात्मक जवळीक लक्षात घेता या ठिकाणी दानवीर लकीशा बंजारा यांचा पुतळा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.  ऑल इंडीया बंजारा सेवा संघाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती कोविंद यांची नुकतीच भेट घेतली. 

आपल्या भारतात बंजारा समाज शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या फार मागे आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यांना एक विशेष वर्गात समाविष्ट करून सर्वागीण विकासाच्या मार्ग मोकळा करावा व घटनेच्या ८ व्या  सूचित बंजारा भाषेचा समावेश करून राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्यावा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार धानोरकर यांनी केले. सामाजिक व आर्थिक प्रगती न झाल्याने बंजारा समाज हा एका ठिकाणी स्थायिक झाला नाही. बहुतेक लोक भूमिहीन असल्याने मजुरीसाठी स्थलांतरीत होण्याशिवाय या समाजाला पर्याय राहत नाही. बंजारा समाजाच्या भाषेला शेड्यूल्ड ८ मध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अमरसिंग तिलावत, ऑल इंडीया बंजारा सेवा संघाचे  राष्ट्रीय महासचिव तुकाराम पवार, कार्यकारी अध्यक्ष के. जी. वंजारा, रामा नाईक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments