पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाला अपघात : २ ठार ६ जखमी

  








पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाला अपघात : २ ठार ६ जखमी 

◾चिंचपल्ली जवळ घटना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर येथे मोठ्या भावाच्या पुण्य स्मरण चा कार्यक्रम आटोपून रात्री १०:०० वाजताच्या सुमारास घरी चामोर्शी ला परत जात असतांना चिंचपल्ली गावाजवळ लहान भावाच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात सासू व सुनेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य ६ जखमी असल्याचे वृत्त आहे. या संदर्भातील अधिक माहितीनुसार अनिल पारखी(पोलीस कर्मचारी) हे १४ एप्रिल रोजी आपल्या मोठ्या भावाच्या पुण्य स्मरणाच्या कार्यक्रमासाठी चंद्रपुरात आले होते दिवसभरातील सर्व धार्मिक कार्यक्रम आटोपून १५ एप्रिलला आपल्या कर्तव्यावर हजर राहणे गरजेचे असल्यामुळे अनिल पारखी आपल्या कुटुंबियांसह रात्री १०:०० वाजताच्या सुमारास चामोर्शी येथे परत जायला निघाले असता चिंचपल्ली गावाजवळ येताच रस्त्यावर अचानकपणे जनावर आडवे आल्यामुळे वाहन क्र MH 33 V 9688 चे वाहणावरील नियंत्रण सुटले व त्यामुळे सदर वाहनाने अंदाजे ३ ते ४ वेळा पलटी खाऊन नवीन बनलेल्या पुलाच्या खाली कोसळल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातात अनिल पारखी यांची आई शोभा पारखी ६५ वर्ष व पत्नी किरण पारखी ३२ वर्ष यांचा घटनास्थळी च मृत्यू झाला तर अनिल पारखी ४० वर्ष, साधना पारखी ४५ वर्ष, राम पारखी ७ वर्ष, आराध्या पारखी ४ वर्ष, नंदिनी १४ वर्ष व ओम १० वर्ष जखमी झाले असून चंद्रपुरात त्यांचेवर उपचार सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे सदर अपघात झाल्यावर गाडीमधील समान अस्तव्यस्त पडल्यामुळे जखमीवरील मदत कार्य करायचे सोडून काहींनी तर पारखी यांच्या पर्स मधील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचे वृत्त आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.



Post a Comment

0 Comments