धार्मिक कार्यक्रमासाठी महाविकास आघाडी सरकारच्या फतव्याची हंसराज अहीर यांनी केली निंदा

 




धार्मिक कार्यक्रमासाठी महाविकास आघाडी सरकारच्या फतव्याची हंसराज अहीर यांनी केली निंदा


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : धार्मिक स्थळी विशेषतः मंदीरामध्ये पूर्व परंपरेनुसार लहान मोठे धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. या कार्यक्रमात ध्वनीक्षेपकाचा वापर सर्व बंधने स्विकारत वर्षानुवर्षे केला जात आहे. असे असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक कार्यक्रमाकरीता परवानगीचा फतवा जारी केला असून हा प्रकार भारतीय संस्कृती व संस्काराचे अवमुल्यन करणारा असून नागरीकांच्या धार्मिक अधिकाराचे हणन करणारा असल्याची संतप्त प्रतिक्रीया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे. 

धार्मिक कार्यक्रमाकरीता बंधने घालुन राज्य सरकारने भारतीय संस्कृतीशी, तिच्या पवित्रा संस्कारांशी प्रतारणा केली आहे. देशाच्या संस्कृतिलाच आव्हान देण्याचे पातक आघाडी सरकारने केले असून अहीर यांनी राज्यसरकारच्या या निर्णयाची घोर निंदा करून निषेध नोंदविला आहे.

Post a Comment

0 Comments