बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ( सावंगी मेघे ) वर्धा च्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन

 



बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल ( सावंगी मेघे ) वर्धा च्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  रविवार दिनांक 24/4/2022  ला जनता हायस्कूल ( सिटी ब्रांच ) वस्ती विभाग बल्लारपूर च्या पटांगणावर सकाळी 9 : 00 वाजता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, सावंगी मेघे वर्धा व बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान शिबिर आयोजन करण्यात आलेला आहे. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. विजय वडेट्टीवार, खासदार श्री. सुरेश धानोरकर, आमदार श्री. सुभाष धोटे, श्री. अरुण धोटे माजी न.प.अध्यक्ष राजुरा, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश देवकडे, डॉ.रजनी हजारे, चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष श्री.रामू तिवारी उपस्थित राहणार असून आपण सर्व सन्माननीय नेतागण सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक सर्व फ्रंटल ऑर्गनायजेशन चे पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय कार्यकर्ता गण यांना नम्र विनंती आहे. 

जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे व या रोग निदान शिबीर चा लाभ  आपल्या वार्डातील गरजू लोकांना मिळावा याचा प्रयास करावा. 

या रोगनिदान शिबिरा अंतर्गत हृदयरोग, कॅन्सर रोग, मुखरोग, स्त्री रोग, मणक्याचे आजार, किडनी, मेंदु रोगाचे निदान व शस्त्रक्रिया करण्यात येईल या व्यतिरिक्त सर्व आजारावर तपासणी करण्यात येईल.

 विशेष म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व रोगावर मोफत उपचार करण्यात येईल तरी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रवी मातंगी, सचिन तोटावार, हाजी  इस्माईल ढाकवाला व त्याचे सहकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत तरी या रोगनिदान शिबीरचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान आवाहन मो. अब्दुल करीम, अध्यक्ष बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments